दिल्ली: देशात 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी सुरु केलीये. पंतप्रधान मोदींची लोकप्रियता कोणापासून लपलेली नाहीये. नरेंद्र मोदींची भारतातच नव्हे तर परदेशातही प्रचंड लोकप्रियता आहे.पंतप्रधान मोदींनी अद्याप निवृत्ती घेण्याचा कोणताही विचार केलेला नसला, तरी एका सर्व्हेक्षणात पीएम मोदींचा उत्तराधिकारी झाल्यास सर्वात योग्य उत्तराधिकारी कोण असेल हे शोधण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. देशाच्या जनतेच्या दृष्टीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या क्रमांकावर आहेत.

CM योगी पंतप्रधानपदाचे दावेदार?
मुख्यमंत्री योगी म्हणाले, मी कोणत्याही पदासाठी दावेदार नाहीये. मला फक्त यूपीमध्ये राहण्याची इच्छा आहे. पंतप्रधान मोदी ही देशाची सर्वात मोठी शक्ती आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली भारताची नवी ओळख निर्माण झालीये. कोणत्याही निवडणुकीत पंतप्रधान मोदींचा सर्वात जास्त विचार केला जातो. 2014 मध्ये ते पंतप्रधान झाल्यापासून समाजातील प्रत्येक घटकाला फायदा झाला आहे. जनतेला दिलेली आश्वासनं त्यांनी पूर्ण केली आहेत.मुलाखतीत सीएम योगींना 2024 च्या लोकसभा निवडणुकीबाबत प्रश्नही विचारण्यात आले होते. 2024 मध्ये भाजपला पुन्हा एकदा बहुमत मिळेल, असं योगींनी सांगितलंय. यावेळी यूपीमध्ये भाजप जास्त जागा जिंकेल. इथं भाजपचंच सरकार येईल. पुढील सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला लोकसभेच्या 300 ते 315 जागा मिळण्याची शक्यता आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.एका सर्व्हेक्षणात देशातील 52.5 टक्के लोकांनी नरेंद्र मोदींना 2024 च्या पंतप्रधानपदासाठी आपली पहिली पसंती असल्याचं सांगितलंय. पंतप्रधानांच्या उत्तराधिकाऱ्यांच्या शर्यतीत ज्या नेत्यांचा समावेश आहे, त्यामध्ये पहिलं नाव अमित शहा यांचं आहे. तर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांना जबरदस्त टक्कर देत आहेत.