महाशिवरात्रीनिमीत्त प्रभासनं चाहत्यांना दिली मोठी गुडन्यूज, 'येत्या सात महिन्यात..'

मुंबई: साउथचा बाहुबली जो बॉलिवूडसह सर्वांनाच जड पडला असा प्रभास आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. त्याचे चाहते प्रभासच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहतात. बाहुबली 2 नंतर प्रभासचे दोन चित्रपट फ्लॉप गेल असल तरी त्याचा काडीमात्र परिनाम त्याच्या स्टारडम झालेला नाही. प्रभासने आता महाशिवरात्रीनिमीत्त त्याच्या चाहत्यांसोबत मोठी बातमी शेअर केली आहे.प्रभासचे एक दोन नव्हे तर 3 बिग बजेट चित्रपट लवकरच येणार आहेत. आता प्रभासने त्याच्या आगामी आदिपुरुष, सालार, प्रोजेक्ट के या चित्रपटाची रिलीज डेट शेअर केली आहे. प्रभासने ट्विट करून ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्याचं हे ट्विट सध्या व्हायरल झालं असून चाहते त्याला शुभेच्छा देत आहेत.प्रभासने ट्विटमध्ये लिहिले- 'रिबेलस्टार या ट्विटमध्ये प्रभासने त्याच्या आगामी चित्रपटांच्या रिलीज डेटबद्दल लिहिले आहे. प्रभासचा 'आदिपुरुष' 16 जून 2023 रोजी , 28 सप्टेंबर 2023 रोजी 'सालार' प्रदर्शित होणार आहे. तर 12 जानेवारी 2024 रोजी 'प्रोजेक्ट के' रिलीज होणार आहे. प्रभासने पुढे लिहिले- 'सगळं सुरळीत झालं तर सात महिन्यांत 3 चित्रपट'प्रभास दीपिका पदुकोण स्टारर मोस्ट अवेटेड चित्रपट 'प्रोजेक्ट के' ची रिलीज डेट शेअर करतांना चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाचे एक नवीन पोस्टर शेअर केले. पोस्टरमध्ये, धुळीच्या पार्श्वभूमीमध्ये बंदुकांसह तीन पुरुष एका हातावर निशाणा साधताना दिसत आहेत. यासोबतच पोस्टरवर 'द वर्ल्ड इज वेटिंग' असे लिहिले आहे आणि चित्रपटाची रिलीज डेट 12 जानेवारी 2024 आहे.हे पोस्टर शेअर करत प्रभासने चाहत्यांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छाही दिल्या. अगदी वैजयंती मुव्हीजनेही चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आणि सर्व चाहत्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने