अवघ्या 19 वर्षाच्या मुलीमुळे पाकिस्तानचा उडालाय थरकाप; सुपर संडेला होणार सुपर मुकाबला

मुंबई: आयसीसी महिला टी 20 वर्ल्डकप 10 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ 12 फेब्रुवारीपासून आपली वर्ल्डकप मोहीम सुरू करेल. भारताचा पहिलाच सामना हा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होणार आहे.दरम्यान, वर्ल्डपपूर्वी भारतीय संघाने दोन सराव सामने खेळले. दुसऱ्या सराव सामन्यात भारताने बांगलादेशचा 52 धावांनी पराभव केले. या सामन्यात भारताची विकेटकिपर ऋचा घोषने नाबाद 91 धावांची तडाखेबाज खेळी केली. अवघ्या 19 वर्षाच्या रिचाने आपला दम सराव सामन्यातच दाखवून दिल्याने पाकिस्तानला चांगलीच धडकी भरली आहे.ऋचा घोष नुकत्याच 19 वर्षाखालील वर्ल्डकप जिंकलेल्या विश्वविजेच्या भारतीय संघात देखील खेळली होती. आता वरिष्ठ महिला टी 20 वर्ल्डकपच्या सराव सामन्यात एकटीच्या जोरावर 183 धावांपर्यंत मजल मारून दिली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी बांग्लादेशला 20 षटकात 8 बाद 131 धावात रोखत सामना जिंकला.मात्र भारताची सामन्याची सुरूवात चांगली झाली नव्हती. 35 धावात तीन विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ऋचाने फक्त 56 चेंडूत 3 चौकार 9 षटकार खेचत 91 धावांची खेळी केली. ऋचाबरोबरच जेमिमाह रॉड्रिग्जने 27 चेंडूत 41 धावांची आक्रमक खेळी केली होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने