'म्हणून दुसरं लग्न करावं लागलं!' सलमानच्या वडिलांचा खळबळजनक खुलासा

मुंबई: बॉलीवूडचा भाईजान सलमान खानचे वडील सलीम खान यांची बॉलीवूडमध्ये वेगळी आणि मोठी ओळख आहे. काही दिवसांपूर्वी या दोन्ही बापलेकांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर त्यांच्या राहत्या घराभोवती पोलिसांचा पहारा होता. यासगळ्यात पटकथाकार सलीम खान चर्चेत आले आहेत.सलीम खान हे गेल्या चार दशकांहून अधिक काळ आपल्या आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वामुळे बॉलीवूडमध्ये चर्चेत असणारे व्यक्तिमत्व आहे. शोले, दीवार, जंजीर, डॉन सारख्या चित्रपटांची पटकथा लिहून त्या चित्रपटांना प्रचंड लोकप्रिय करण्याचे श्रेय सलीम - जावेद या जोडगोळीला जाते. काही काळानंतर त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. त्यानंतर त्यांनी मात्र कधीही एकत्रित काम केले नाही. अजुनही त्यांच्यात अबोला आहेच.सलीम खान यांच्या नावाभोवतीचे ग्लॅमर हे काही कमी झालेलं नाही. ते नेहमी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिले. अगोदर एक लग्न झाले असताना त्यांनी दुसरे लग्न का केले याविषयीचा खुलासा बऱ्याच वर्षानंतर केला आहे. सोशल मीडियावर सलीम खान चर्चेत आले आहे.हेलेनसोबत केलेल्या दुसऱ्या लग्नाविषयी सलीम खान म्हणाले की, मी जेव्हा तरुण होतो तेव्हा त्यांच्यासाठी मदतीसाठी पुढाकार घेतला होता. तो एक भावनिक प्रसंग आमच्या दोघांसाठी होता. आमचं नातं घरात कुणीच स्विकारलं नसतं. सलीम खान यांनी एका मुलाखतीमध्ये पहिली पत्नी सलमा यांच्याविषयी एक किस्सा सांगितला आहे.

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक अरबाज खानचा द इव्हिझिबल विथ अरबाज खान हा चर्चेत आला आहे. त्याला प्रेक्षकांची पसंती देखील मिळताना दिसत आहे. त्याचा टीझर समोर आला आहे. त्यामध्ये अरबाज खाननं पहिले गेस्ट म्हणून त्यांच्या वडिलांनाच बोलावले आहे. यावेळी त्यानं त्यांच्या वैयक्तिक आय़ुष्याविषयी विचारलेले प्रश्न चर्चेत आले आहे.हेलेन आणि माझ्या अफेयरविषयी खूप चर्चा होती. हो आम्ही प्रेमात होतो. मी त्यांना मदत करण्याच्या भावनेतून गेलो खरा पण त्यांच्या प्रेमात पडलो. पण त्या नात्याला कुणीही स्विकारलं नाही. अशी खंतही सलीम खान यांनी यावेळी व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने