"लग्न कधी करणार?" नागालँडचे भाजप मंत्री म्हणाले, आता शादी डॉटकॉम...

नागालँड: नागालँड येथील भाजपचे मंत्री तेमजेन इमना अलाँग हे आपल्या विनोदी स्वभावामुळे परिचित आहेत. ते अनेकदा आपलेच विनोदी फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. तर त्यांच्या या स्वभावामुळे त्यांच्यावर अनेकदा चर्चा केल्या जातात. त्यांच्या लग्नाविषयी एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तेमजेन यांना एका वृत्तवाहिनीतील पत्रकार त्यांच्या लग्नाविषयी विचारते त्यावेळी त्यांनी भन्नाट उत्तर दिलं आहे. "अजून तरी लग्नाविषयी काही ठरवलं नाही. माझं मलाच माहिती नाही पण होईल ते बघून घेता येईल, मी शादी डॉट कॉम वाल्यांशी बोललो आहे, आता बघू काय होतंय ते, ते लग्नासाठी पूर्ण स्पॉन्सर करणार आहेत... अजूनही त्यांच्याशी चर्चा करणार आहे" असं भन्नाट उत्तर तेमजेन यांनी माध्यमांना दिलं आहे.तेमजेन यांनी सांगितलं की, येथील ८० टक्के लोकं शिक्षित आहेत. त्यामुळे इथे शिक्षण घेऊन अनेकजण व्यवसाय किंवा नोकरीसाठी बाहेर जातात. त्याचबरोबर मोदी यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण क्षेत्रात येथे चांगली प्रगती झाली असल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने