शर्मिला यांनी मुख्यमंत्र्यांसाठी खरेदी केले शूज; कारण जाणून तुम्हीही डोक्याला हात लावाल

हैदराबाद : वायएसआर तेलंगणा पक्षाच्या अध्यक्षा वायएस शर्मिला यांनी सध्याच्या राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव  यांनी राज्यातील जनतेला दिलेलं एकही आश्वासन पूर्ण केलं नाही, असा आरोप त्यांनी केलाय.शर्मिला यांनी केसीआर  यांना त्यांच्या पदयात्रेत सहभागी होण्याचं आवाहन केलंय. विशेष म्हणजे, तेलंगणामध्ये या वर्षी विधानसभा निवडणुका  होणार आहेत. निवडणुकीपूर्वी शर्मिला या राज्यभर पदयात्रा काढत आहेत.गेल्या नऊ वर्षांत राज्यात असा एकही वर्ग नाही, ज्याला अकार्यक्षम शासनाचा त्रास झाला नाही. शेतकऱ्यांच्या दुर्दशेपासून ते तरुणांच्या नोकऱ्यांपर्यंत, महिलांच्या प्रश्नांपासून ते शिक्षणापर्यंत इत्यादी केसीआर यांनी दिलेली प्रत्येक आश्वासनं पूर्ण करण्यात त्यांना अपयश आलंय. त्यामुळं राज्याचा विकास खुंटला आहे. या शासनामुळं राज्याचं मोठं नुकसान झालंय, असं शर्मिलांनी सांगितलं.
शर्मिलांनी मुख्यमंत्र्यांसाठी खरेदी केले शूज

हैदराबादमध्ये शर्मिला ह्या पत्रकारांशी संवाद साधत होत्या. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांसाठी बूट खरेदी केल्याचं सांगितलं. पत्रकारांसमोरच एका बॉक्समधून त्यांनी शूज बाहेर काढून दाखवलं. त्या म्हणाल्या, मी माझ्या पदयात्रेत केसीआर यांना सहभागी होण्याचं आवाहन केलंय. यावेळी मी त्यांना शूजचे जोडे देणार आहे. मला राज्यात कोणतीही अडचण दिसली नाही, तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन. पण, जर हे खरं नसेल तर केसीआर यांना राजीनामा द्यावा लागेल आणि राज्यातील जनतेची माफी मागावी लागेल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने