हवेत होती बिग बॉसनं धाडकन् जमिनीवर आणली! निम्रतचा चेहराच पडला

मुंबई: बिग बॉसच्या फिनालेला केवळ पाचच दिवसांचा कालावधी उरला आहे. यावेळचा बिग बॉसचा सीझनही चाहत्यांच्या अपेक्षांना पूर्ण करणारा होता. असे सोशल मीडियावर दिसून आले आहे. यंदा या रियॅलिटी शो चा सोळावा सीझन असून त्यामध्ये कोण विजेता होणार याची चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे. आता तर वेगवेगळी नावं समोरही आली आहेत.यासगळ्यात बिग बॉसमधील ज्या स्पर्धकाविषयी चर्चा होत होती त्या निम्रत कौरला बिग बॉसनं बाहेरचा रस्ता दाखवला आहे. गेल्या काही दिवसांपासून निम्रत कौरची खूप चर्चा आहे. यंदाच्या सीझनमध्ये तर ती संभाव्य विजेती म्हणूनही चर्चा होती. अशावेळी तिचे घराबाहेर जाणे हे चाहत्यांसाठी धक्कादायक मानले जात आहे. निम्रत ही आक्रमक स्वभावाची आणि परखडपणे आपले मत व्यक्त करणारी स्पर्धक होती.निम्रत बिग बॉसच्या घरात असताना निम्रतनं मोठ्या फुशारक्या मारत आपण वाट्टेल ते करु अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यामुळे ती सोशल मीडियावर चर्चेतही आली होती. अनेकांना तर ती फारच गर्विष्ठही वाटली होती. अजुन बिग बॉस संपलेही नाही तोच निम्रत कौर अहुवालियावर नेटकऱ्यांनी टीका सुरु केली आहे. काहींना तिचं घराबाहेर पडणं आनंदाची बाब वाटली आहे.एका नेटकऱ्यानं तर हवेत असणाऱ्या निम्रतला बिग बॉसनं जमिनीवर आणल्याचे म्हटले आहे. निम्रत शेवटच्या फेरीपर्यत बिग बॉसमध्ये असेल असा अंदाज तिच्या चाहत्यांनी लावला होता. मात्र तसे काही झाले नाही. त्यामुळेच की काय आता त्यांची निराशा झाली आहे. निम्रत बिग बॉसमधून बाहेर पडली आहे.अलीकडेच प्रेक्षकांच्या कमी मतांमुळे सुंबुल तौकीर खान ही घराबाहेर पडली आहे. सुंबुलला बाहेर काढल्यानंतर 'बिग बॉस 16' मध्ये 6 स्पर्धक शिल्लक होते. पण आता निमृतच्या एलिमिनेशननंतर या सीझनला टॉप-5 स्पर्धक मिळाले आहेत.या सीझनमधील टॉप-5 स्पर्धकांची निवड करण्यासाठी बिग बॉसच्या घरात बाहेरून सामान्य लोकांना बोलावण्यात आल्याचं बोललं जात आहे. त्यांनी घरात जाऊन लाइव्ह वोटिंग भाग घेतला. जनतेने त्यांच्या आवडीच्या स्पर्धकांना त्यांच्या कामगिरी आणि योगदानाच्या आधारावर वोटिंग केली आहे. ही मतदान प्रक्रिया 6 फेब्रुवारी रोजी येणाऱ्या एपिसोडमध्ये दाखवली जाईल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने