PM मोदी देशासाठी नाही तर मित्रांच्या फायद्यासाठी..; सोनिया गांधींचा भाजपवर हल्लाबोल

रायपूर: छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये काँग्रेसचं 85 वं अधिवेशन सुरू झालं आहे. या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. काँग्रेसची ही परिषद राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.या अधिवेशनात संबोधित करताना काँग्रेस नेत्या सोनिया गांधी म्हणाल्या, सध्या आपल्या देशात अल्पसंख्याकांना लक्ष्य केलं जात आहे. काँग्रेस केवळ राजकीय पक्ष नाही तर भारतीयांच्या हक्काचं व्यासपीठ आहे. भारतीयांच्या हक्कासाठी लढणारा पक्ष ही काँग्रेसची ओळख आहे.अधिवेशनात सोनिया गांधींनी मोदी सरकारवरही जोरदार निशाणा साधला. त्या म्हणाल्या, केंद्र सरकार आणि आरएसएसनं सर्व स्वायत्त संस्था ताब्यात घेतल्या आहेत. आपला पंतप्रधान देशासाठी नाही तर आपल्या मित्रांसाठी शक्ती वापरत आहे, असा आरोपही त्यांनी केला. यावेळी सोनियांनी राहुल गांधी यांचंही कौतुक केलं.सोनिया गांधींनी पक्षाच्या नेत्यांना आज संबोधित केलं. आज छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये आयोजित काँग्रेस महाअधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. या महाअधिवेशनात सहभागी होण्यासाठी प्रियंका गांधी सकाळी 9 वाजता रायपूरमध्ये पोहोचल्या. इथं त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं आणि रोड शोही करण्यात आला. त्याचवेळी आता सोनिया गांधी अधिवेशनात काँग्रेस नेत्यांना संबोधित करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने