माझं वय सांगायचा कुणी प्रयत्न केला तर कोणालाच सोडणार नाही; उदयनराजेंचा थेट इशारा

सातारा: खासदार उदयनराजे भोसले यांचा उद्या (शुक्रवार, 24 फेब्रुवारी) वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त साताऱ्यात दोन दिवस आधीपासूनच विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.सातारा शहरात विविध ठिकाणी शुभेच्छांचे बॅनर झळकण्यात आले आहेत. बुधवारी रात्री साताऱ्यातील गांधी मैदानावर शरीर सौष्ठव स्पर्धेचं  आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेला खासदार उदयनराजे  देखील उपस्थित होते.स्पर्धेदरम्यान उदयनराजेंनी कॉलर उडवून उपस्थित तरुणांची मनं जिंकली. यावेळी अभिनेता अनुप सिंह ठाकूर उपस्थित होता. उदयनराजेंनी नेहमीप्रमाणं आपली कॉलर उडवताच उपस्थित तरुणांनी एकच जल्लोष केला.


यावेळी माध्यमांशी संवाद साधताना उदयनराजेंनी आपल्या वयाबाबत मोठं विधान केलंय. माझं वय मी सांगणार नाही आणि कुणी सांगायचा प्रयत्न केला तर याद राखा. मी कोणाला सोडणार नाही, असा इशाराच खासदार उदयनराजेंनी दिला आहे. मात्र, हा नेमका इशारा कोणाला होता हे समजू शकलं नाही. यानंतर शरीर सौष्ठव स्पर्धेविषयी बोलताना ते म्हणाले, मी जर या ठिकाणी स्पर्धेत पोज मारायला लागलो, तर इथे कोणीही थांबणार नाही, अशी मिश्किल टिपण्णी त्यांनी यावेळी केली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने