राहुल गांधींना चीनविषयी चांगले ज्ञान असेल तर...; मोदी सरकारमधील मंत्र्यांचं मोठं विधान

नवी दिल्ली: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना परराष्ट्र धोरणाविषयी फारशी माहिती नाही आणि त्यांनी अधिक शिकण्याची गरज आहे, अशा शब्दांत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. भारत सरकारच्या चीनबाबत संरक्षणात्मक नितीवर राहुल गांधींकडून करण्यात येत असलेल्या टीकेला जयशंकर यांनी कठोर शब्दात प्रत्युत्तर दिलं.एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना राहुल गांधी म्हणाले होते, "चीनबद्दल बोलायचे झाले, तर कुठेतरी सरकार बचावात्मक आहे.



चीनच्या सीमेवर शांततेच्या काळातील ही इतिहासातील सर्वात मोठी तैनाती आहे. आम्ही तेथे मोठ्या प्रमाणात सैनिक तैणात केले आहेत. या सरकारने सीमेवरील पायाभूत सुविधांच्या खर्चात पाच पटीने वाढ केली आहे. आता सांगा कोण बचावात्मक आणि उदार आहे? खरं च खरं कोण बोलतंय? गोष्टींचं योग्य चित्रण कोण करतंय? परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी राहुल गांधी यांच्या परराष्ट्र धोरणावरील वक्तव्यावर निशाणा साधत म्हटले आहे की, जर त्यांना चीनविषयी चांगले ज्ञान असेल तर ते काँग्रेसचे म्हणणे ऐकण्यास तयार आहेत.

जयशंकर म्हणाले की, मी माझ्या बचावात एवढेच सांगू शकतो की, मी चीनमध्ये सर्वात जास्त काळ राजदूत राहिलेलो आहे. या सीमाप्रश्नांना मी बराच काळ सामोरे जात आहे. मी असे म्हणत नाही की मी सर्वात ज्ञानी व्यक्ती आहे, परंतु तेथे काय आहे याबद्दल माझे आकलन चांगले आहे. जर त्यांच्याकडे (राहुल) चीनविषयी चांगले ज्ञान असेल तर मी ऐकण्यास नेहमीच तयार आहे. माझ्यासाठी आयुष्य ही शिकण्याची प्रक्रिया आहे.चीनने गेल्या वर्षी पँगाँग सरोवरावर पूल बांधल्याबद्दल काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या नाराजीचा उल्लेख करताना परराष्ट्र मंत्री म्हणाले की, १९६२ च्या युद्धापासून हा भाग चीनच्या ताब्यात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने