कॅप्टन अमरिंदर सिंग यांना झटका; खासदार पत्नी प्रनीत कौर यांचे काँग्रेसकडून निलंबन

पंजाब: पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी आणि खासदार प्रनीत कौर यांना काँग्रेस पक्षाने पक्षविरोधी कारवायांच्या आरोपाखाली निलंबित केले आहेप्रनीत कौर पंजाबच्या पटियाला येथून काँग्रेसच्या लोकसभा खासदार आहेत. प्रनीत कौर यांना कारणे दाखवा नोटीस बजावून, त्यांना पक्षातून बाहेर का काढू नये असा प्रश्न विचारत याचे तीन दिवसांत स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे.प्रणीत कौर यांना काँग्रेसमधून काढून टाकण्याची मागणी बऱ्याच दिवसांपासून होत होती. पक्षाच्या बैठकीत यासंदर्भातील ठरावही मंजूर करण्यात आला होता.तर, पंजाब निवडणुकीपूर्वीच कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस पक्षाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. कौर यांचा पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभाग असल्याचा दावा पंजाब काँग्रेसने यापूर्वी केला होता.कॅप्टन म्हणून ओळखले जाणारे सिंग हे २००२ ते २००७ आणि मार्च २०१७ ते सप्टेंबर २०२१ या काळात पंजाबचे मुख्यमंत्री होते. नंतर त्यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्यात आले. यानंतर त्यांनी काँग्रेसला रामराम केला आणि नंतर पीएलसीची स्थापना केली. काही दिवसांपूर्वी त्यांनी पीएलसी पक्ष भाजपमध्ये विलीन केला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने