अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी..! राणी मुखर्जीच्या नवीन सिनेमाचा थरारक ट्रेलर

मुंबई: राणी मुखर्जीच्या आगामी सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. मिसेस चॅटर्जी vs नॉर्वे  असं राणीच्या आगामी सिनेमाचं नाव आहे.अंगावर काटा आणणारा सिनेमाचा ट्रेलर पाहून डोळ्यात पाणी येतं. आपल्या बाळांसाठी आई कोणत्या ठरला जाऊ शकते याचा अनुभव या सिनेमाचा ट्रेलर पाहून येतो. सत्य घटनेवर आधारित हा सिनेमा आहेराणी मुखर्जी हि गेले अनेक महिने अभिनय क्षेत्रापासून दूर आहे. बॉलिवूड मधली हि मर्दानी अभिनेत्री नवी सिनेमात कधी दिसणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. राणीचे चाहते सुद्धा तिच्या आगामी सिनेमाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

अखेर राणीच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. या सिनेमातून राणीने पुन्हा एकदा तिचा शानदार अभिनय दाखवलाय.मिसेस चॅटर्जी Vs नॉर्वेच्या ट्रेलरची सुरुवात मिसेस चॅटर्जीच्या व्यक्तिरेखेपासून होते. ती कोलकाता सोडून तिच्या पती आणि मुलांसह नॉर्वेमध्ये राहते. मिसेस चॅटर्जी तिचे आयुष्य आनंदात जगते.आणि अचानक एके दिवशी असे काही घडते की सर्वकाही बदलून जाते. तिची दोन्ही मुलं कायद्याचा नावाखाली हिरावून घेतली जातात.ती चांगली आई नाही असं म्हटलं जातं. यानंतर मिसेस चॅटर्जीचा आपल्या मुलांना परत मिळवण्यासाठीचा लढा सुरू होतो आणि ती आई म्हणून संपूर्ण देशाविरुद्ध उभी राहते.मिसेस चॅटर्जी Vs नॉर्वे 17 मार्च ला रिलीज होणार आहे. या सिनेमात राणी मुखर्जी शिवाय जिम सरभ, नीना गुप्ता आणि अनिर्बन भट्टाचार्य मुख्य भूमिकेत आहेत. सिनेमाचे दिग्दर्शन आशिमा छिब्बर यांनी केले आहे. राणी मुखर्जीचा आणखी एक सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट होणार यात शंका नाही.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने