अंबानीची बातच न्यारी! मुकेश अंबानींनी सिद्धार्थ-कियाराला दिलेलं लग्नाचं गिफ्ट चर्चेत,काय आहे त्यात खास?

मुंबई:  सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी हे लव्हली कपल मंगळवारी 7 फेब्रुवारी रोजी विवाहबंधनात अडकले. दोघांनी राजस्थानातील जैसलमेर येथील सूर्यगड पॅलेसमध्ये सात फेरे घेतले. लग्नानंतर लगेचच दोघेही दिल्लीला परतले. दरम्यान, त्यांच्या लग्नाचे अनेक फोटोही व्हायरल झाले आहेत.त्यातच आता दोघांना लग्नात आलेल्या गिफ्टच्याही चर्चा रंगल्या आहे. करणने दोघांना तिन चित्रपटांसाठी साईन केल्याचं बोललं जात असतांनाच आता मुकेश अंबानी यांनी या जोडप्याला खास गिफ्ट दिल्याचं बोललं जात आहे.सिड-कियाराला अंबानी कुटुंबाकडून मोठी भेट देण्यात आल्याचे वृत्त आहे. मुकेश अंबानी यांनी सिद्धार्थ आणि कियारा यांना रिलायन्स ट्रेंड्स फूटवेअरचे नवीन ब्रँड अॅम्बेसेडर बनवले आहे. रिलायन्स रिटेलच्या व्हेंचर ट्रेंड्स फूटवेअरने या जोडप्याला ब्रँड अॅम्बेसेडर बनवल्याची माहिती दिली आहे.रिलायन्स रिटेल लिमिटेड कंपनीचे फॅशन आणि लाइफस्टाइलचे अध्यक्ष आणि सीईओ अखिलेश प्रसाद यांनी ही माहिती देतांना लिहिलयं की, 'कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​हे बॉलीवूडचे दोन सर्वात लोकप्रिय आणि प्रतिभावान युवा आयकॉन आहेत, त्यांचे खूप चाहते आहेत. त्यांना ब्रँड अॅम्बेसेडर बनवल्याने तरुणांसोबतचे आमचे नाते घट्ट होईल.'अंबानी कुटुंबाकडून करोडोंच्या भेटवस्तू मिळाल्यानंतर सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी खूप खूश आहेत. वास्तविक कियारा अडवाणीचे अंबानी कुटुंबाशी चांगले संबंध आहेत. कियारा आणि मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी या बालपणीच्या मैत्रिणी आहेत. ईशा अंबानी पती आनंद पीरामलसोबत सिद्धार्थ कियाराच्या लग्नात पोहोचली होती. आता मुंबईत होणाऱ्या रिसेप्शनला अंबानी कुटुंबीय उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने