Bigg Boss 16 ची ट्रॉफी हरली प्रियंका चाहर चौधरी.. तरी मिरवत घेऊन गेली 25 लाख रुपये..कसं झालं शक्य?

मुंबई:  बिग बॉस 16 च्या विजेत्याचं नाव अखेर जाहिर झालं आणि अनेक दिवसांचा वाट पाहण्याचा प्रेक्षकांचा संघर्ष अखेर संपला. अनेक बड्या हुशार स्पर्धकांना मागे टाकत प्रियंका चाहर चौधरीनं टॉप 3 पर्यंत मजल मारली होती पण शो मध्ये तिचा प्रवास मात्र तिथेच थांबला. भले ती शो मधून बाहेर पडली,ट्रॉफी तिच्या हातातून गेली तरी प्रियंकाची स्वारी मात्र भलतीच खूश आहे.बिग बॉस 16 ला अखेर त्याचा विनर मिळाला. ग्रॅंड फिनालेचा एपिसोड रविवारी 12 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7 वाजता सुरु झाला तो तब्बल पुढील 5-6 तास रंगला. या सीझनचे जवळपास सगळेच स्पर्धक फिनालेत सामिल झाले होते. 

टॉप 5 स्पर्धकांविषयी बोलायचं झालं तर सुरुवातीला शालिन भनोट बाहेर पडला आणि त्यानंतर अर्चना गौतम.शालीना शो मधून बाहेर पडताच त्याला गूड न्यूज मिळाली ती म्हणजे एकता कपूरचा आगामी प्रोजेक्ट तो लकरच साइन करणार आहे. सोबत प्रियंका चहर चौधरीलाही अशी मोठी गूड न्यूज मिळालीय की सध्या तिचा आनंद गगननात मावेनासा झाला आहे.शो मध्ये ब्युटी कॉन्टेस्ट जिंकून तिनं 25 लाखाची मोठी रक्कम जिंकल्याचं समोर आलं आहे. प्रियंका चाहर चौधरी भले शो ची विजेती ठरली नाही पण बाहेर येताच तिच्या झोळीत मोठं गिफ्ट पडलं असं म्हणायला हरकत नाही. कलर्स वाहिनीचे स्पॉन्सर माय ग्लॅमनं बिग बॉस 16 दरम्यान एक ब्युटी कॉम्पिटिशन ठेवली होती.यामध्ये बिग बॉसच्या सर्व महिला स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये जिला प्रेक्षक जास्त वोट करतील तिला माय ग्लॅमच्या जाहिरातीत श्रद्धा कपूर सोबत काम करण्याची संधी मिळेल आणि सोबत 25 लाख रुपये देखील मिळतील अस सांगितलं गेलं होतं. ही खास ऑफर प्रियंका चौधरीनं आपल्या खिशात टाकली आहे. याव्यतिरिक्त तिला एक खास सरप्राइज मिळालं आहे.बातमी आहे का प्रियंकाला फक्त माय ग्लॅमची श्रद्धा कपूरसोबतची जाहिरात आणि 25 लाख रुपयेच नाहीत तर एक मोठा सिनेमाही ऑफर झाला आहे. बातमी आहे की शाहरुखच्या 'डंकी' सिनेमात तिला भूमिका ऑफर झाली आहे.याव्यितिरिक्त सलमान खानने देखील तिच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आता दबंग खान बोललाय म्हणजे ती गोष्ट तो नक्की करणार. सलमान खाननं फिनाले दरम्यान इतकंही सांगितलं की शो ची विनर प्रियंका चौधरीच आहे.प्रियंकाचा आतापर्यंतचा इंडस्ट्रीतला प्रवास चांगला राहिला आहे. तिनं काही ओटीटी शोज आणि जाहिरातींमधून काम केलं आहे. तिनं आपल्या काही वर्षांच्या कारर्किर्दीत चांगल्या दर्जाचं काम केलं आहे. आशा आहे की भविष्यातही तिच्याजवळ चांगले प्रोजेक्ट्स येतील.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने