प्राधिकरणातील गावांत विकासकामे सुरू करा; दीपक केसरकर

कोल्हापूर : कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये क्रीडांगण, व्यायामशाळा, बागबगीचा, नागरी सुविधा देण्यासाठी नियोजन करावे. यासाठी प्राधिकरणाकडे आलेल्या निधीचा योग्य विनियोग करावा, अशा सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिल्या. पालकमंत्री केसरकर यांनी शासकीय विश्रामगृहात प्राधिकरणाच्या स्थापनेपासून सर्व माहितीचा आढावा घेतला.केसरकर म्हणाले, की प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील ४२ गावांमध्ये नागरिकांना सोयी-सुविधा दिल्या पाहिजेत. ही कामे प्राधान्याने करावीत. लहान मुलांसाठी क्रीडांगण, बगीचा, तालीम, व्यायामशाळा, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र व इतर सोयी-सुविधा तत्काळ द्याव्यात. यासाठी प्राधिकरणातील ४२ गावांना भेटू देऊन तेथील वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे. ज्या गावात तातडीने आणि प्राधान्याने सुविधा द्यायच्या आहेत त्या कामांना प्राधान्य दिले पाहिजे.प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी प्राधिकरणाने सुनियोजित कार्यक्रम तयार करावा.’ दरम्यान, प्राधिकरणाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय माने म्हणाले की, सिद्धांत राऊत व मिलिंद कांबळे यांच्यासमवेत ३० ग्रामपंचायतींना प्रत्यक्ष भेट दिली आहे. यामध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे. ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक यांना मार्गदर्शन करावे. काही ग्रामपंचायतींना प्राधान्यक्रम ठरवून त्यांचे प्रस्ताव प्राधिकरणाकडे पाठवा, अशाही सूचना केसरकर यांनी दिल्या.

प्राधिकरण कार्यालयाच्या संकेतस्थळाचे अनावरण

पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते प्राधिकरणाच्या kolhapurkuada.org.in या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयकुमार चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी माने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने