विराट - रोहित वाद! शास्त्रींनी रूममध्ये बोलवलं अन्... माजी प्रशिक्षकाचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई: भारतीय पुरूष वरिष्ठ संघात गेल्या काही वर्षात अनेक वादळे उठली होती. भारतीय संघात विराट कोहली आणि रोहित शर्मा असे दोन ग्रुप असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. भारताने 2019 चा वर्ल्डकप हरल्यानंतर या चर्चांना उधाण आले होते. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात वाद आहेत.त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले असल्याचेही वृत्त आले होते. त्यावेळचे संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी या सगळ्या अफवा आहेत असे म्हणत वादाचा विषय उडवून लावला होता.मात्र आता भारताचे माजी क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर. श्रीधर यांनी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात वाद होता यावर अप्रत्यक्षरित्या शिक्कामोर्तबच केलं आहे. त्यांनी आपल्या 'Coaching Beyond' या पुस्तकात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.विराट - रोहित वादाबाबत श्रीधर आपल्या पुस्तकात लिहितीत की, '2019 चा वर्ल्डकप झाल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये दोन गट पडल्याचे वृत्त माध्यमांमध्ये झळकत होते. संघात रोहितचा वेगळा आणि विराट कोहलीचा वेगळा गट आहे असे बोलले जात होते.''या दोघांपैकी एकाने दुसऱ्याला सोशल मीडियावर अनफॉलो केले होते. अशा प्रकारच्या गोष्टी लवकरात लवकर सोडवल्या नाहीत तर वाद आणि फूट वाढण्याची शक्यता असते.'श्रीधर पुढे म्हणतात की, 'आम्ही वर्ल्डकपनंतर 10 दिवासांनी अमेरिकेत वेस्ट इंडीजविरूद्ध टी 20 मालिका खेळण्यासाठी दाखल झालो. दाखल झाल्या झाल्या रवी शास्त्रींनी पहिले काम केले ते म्हणजे विराट कोहली आणि रोहित शर्माला त्यांच्या रूममध्ये बोलवलं. त्यांना भारतीय क्रिकेटमधलं वातावरण हे खेळीमेळीचं असलं पाहिजे हे समजावून सांगितलं.'

'त्यामुळे तुम्हा दोघांमध्ये वाद असू नयेत. सोशल मीडियावर जे काही झालं ते ठिक आहे मात्र तुम्ही दोघं अनुभवी क्रिकेटपटू आहात. हे त्वरित थांबलं पाहिजे. रवी शास्त्रींनी खास आपल्या शैलीत या दोघांना समजावलं.'रवी शास्त्रींनी समजावल्यानंतर कोहली - रोहितने विषय बाजूला ठेवला असं श्रीधर सांगतात. 'तुम्हाला आढळून आले असेल की त्यानंतर संघातील गोष्टी सुरळीत होऊ लागल्या. रवी शास्त्रींनी प्रकरण अत्यंत काळजीपूर्वक हाताळलं. त्यांनी दोन्ही खेळाडूंना एकत्र आणलं. त्यांना एकत्र बसवून बोलायला लावलं. रवी शास्त्रींना कोणताही वेळ न दडवडता हे केलं. रवी शास्त्रींमुळे संघ सगळ्यापेक्षा मोठा आहे हे अधोरेखित झालं.'

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने