मराठीत बनतोय का शाहरुख-आलियाचा 'डीअर जिंदगी?', 'मीरा' मधील केतकी-प्रसाद ओक जोडीनं चर्चेला उधाण..

मुंबई: केतकी माटेगावकरला पाहिलं की आठवते ती 'टाइमपास' मधील प्राजू.. त्या सिनेमातील प्राजूनं अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं होतं आणि इंडस्ट्रीला मिळाली होती उत्तम गायिकेसोबतच एक गुणी अभिनेत्री.केतरी माटेगावकरची भलतीच क्रेझ तेव्हा लोकांना होती आणि आजही तिची जादू कायम आहे.. अगदी ८ वर्षाचा मोठा ब्रेक तिनं इंडस्ट्रीमधून घेतला असला तरी.केतकीनं गाणं हे आपलं पहिलं प्रेम आहे असं सांगत त्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी अभिनयातून ब्रेक घेतला होता. पण आता ती पुन्हा येतेय 'मीरा' या तिच्या आगामी सिनेमातून.केतकीनं अनेक वर्ष आपलं गाणं आणि अभिनयानं रसिक मनावर राज्य केलंय. सा रे ग म प लिटिल चॅम्प्स मधनं पुढे आलेल्या केतकीला सुजय डहाकेचा 'शाळा' सिनेमा मिळाला अन् तिचं नशिबच पालटलं.तिच्या अभिनयाचं त्यावेळी खूप कौतूकही झालं. 'शाळा' सिनेमांनतर मांजरेकरांचा 'काकस्पर्श', 'तानी' अशा सिनेमातून केतकीनं आपल्या वयापेक्षा अधिक समज असलेल्या भूमिका साकारल्या.आणि पुढे रवी जाधवच्या 'टाईमपास'मुळे तर महाराष्ट्रातील घराघरात तिला प्राजू म्हणजे प्राजक्ता म्हणूनच ओळखलं जाऊ लागलं.आता तिच्या आगामी 'मीरा' सिनेमाविषयी तिनं काही दिवसांपूर्वी पोस्टमधून जाहीरपणे सांगितलं होतं. त्यामुळे चाहते भलतेच खूश होते. आता केतकीनं पुन्हा एक पोस्ट केलीय ज्यात तिच्यासोबत प्रसाद ओक अभिनेता म्हणून काम करणार आहे हे स्पष्ट होताना दिसत आहे.केतकी सोबत प्रसाद ओक ही जोडी पाहिल्यावर एका चर्चेला उधाण मात्र आले आहे. दोघांच्या वयामधील अंतर पाहता आता लोक म्हणू लागलेयत...मराठीतही आता शाहरुख आलियाचा 'डिअर जिंदगी' धाटणीचा सिनेमा बनतोय की काय.सिनेमाच्या कथानकावरनं तर्क वितर्क लावले जात आहेत. 'डिअर जिंदगी' मध्ये आलिया(कायरा) ही सिनेमॅटोग्राफर असते,जिचं ब्रेकअप झाल्यानं ती पूर्णतः तूटते,वैयक्तिक आयुष्यात खूप मोठ्या मानसिक संघर्षाचा सामना ती करत असते..

तेव्हा मुंबईतून गोव्यात आई-वडीलांजवळ रहायला आल्यावर तिची भेट होते एका मानसोपचार तज्ञाशी ..जी भूमिका शाहरुखनं साकारली आहे. शाहरुखकडे ती खरंतर मानसिक स्वास्थ्य ठीक होण्यासाठी जात असते. त्यातून शाहरुख ती बरी व्हावी म्हणून तिच्याशी मैत्री करतो..एक पेशंट म्हणून तिला पाहतो..आलियाला(कायरा) मात्र त्याच्या रुपात एक मित्र..एक सखा भेटतो,ती त्याच्या अधिक जवळ जाऊ पाहते...त्याच्या प्रेमात पडते...पण तिथेही वेळीच तिला योग्य मार्ग दाखवत शाहरुख त्यांच्यात एक निखळ मैत्रीच आहे याची जाणीव करून देतो...आणि आलिया तिच्या मानसिक संघर्षावर मात करत ती लढाई जिंकते..आयुष्याकडे पाहण्याचा तिचा पूर्ण दृष्टीकोनच बदलतो...अशी साधारण ती कथा आहे..त्यामुळे आता 'मीरा' सिनेमात केतकी आणि प्रसादची जोडी पाहून 'डिअर जिंदगी' धाटणीचाच हा सिनेमा असणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत..आता सध्या तरी 'मीरा' च्या कथानकाविषयी काही समोर आलं नसलं तरी जाणून घेण्याची उत्सुकता लोकांमध्ये वाढलीय याचा सिनेमाला फायदा होणार हे मात्र नक्की..

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने