बुडत्या बॉलिवुडला टॉलिवुडचा आधार! Shah Rukh Khan च्या जवानमध्ये 'हा' साउथ सुपरस्टार करणार चित्रपट हिट?

मुंबई:   गेल्या काही दिवसांपासून बॉलिवुडचे ग्रह काही ठिक नव्हते. बॉक्स ऑफिसवर फक्त टॉलिवुडचाच बोलबाला होता. मग तो आरआरआर असो बाहुबली किंवा केजीएफ..या चित्रपटांनी मार्केट गाजवलं. त्यांच्यासमोर बॉलिवुड फिकं पडलं. मात्र त्यानंतर बॉलिवुचा बादशाह शाहरुखचा पठाण आला आणि त्यानं सगळे रेकॉर्ड मोडत पुन्हा बॉलिवुडला उंचीवर नेलं.शाहरुख खानने पठाणच्या माध्यमातून बॉक्स ऑफिसवर दहशत निर्माण केली . रिलीजच्या पहिल्या टप्प्यातच या चित्रपटाने जगभरातून 1000 कोटींहून अधिक कमाई केली आहे. हा शाहरुखचा कमबॅक चित्रपट होता. शाहरुखनं चार वर्षानंतर पठाणच्या माध्यामातुन मोठ्या पडद्यावर परतला. आता त्याचे चाहते त्याच्या आगामी 'जवान' चित्रपटाची वाट पाहत आहेत. मात्र आता या चित्रपटात एक ट्विस्ट आहे. त्याच्या या चित्रपटात कॅमिओ रोलसाठी साऊथच्या एका बड्या सुपरस्टारचे नाव पुढे आलं आहे.ते नावं म्हणजे सध्या आरआरआरमधलं चर्चेत असलेलं नावं राम चरण. गेल्या वर्षी रिलीज झालेल्या RRR या चित्रपटाने राम चरणच्या चाहत्यांची संख्या आणखीच वाढवली. फक्त भारतातच नव्हे तर देशाबाहेरही त्याची क्रेझ पहायला मिळतं आहे. या चित्रपटाने जगभरात कमाईचे झेंडे उंचावले. त्याचवेळी आता जवान मधील कॅमिओसाठी त्याचं नाव चर्चेत आहे.मीडिया रिपोर्ट्सवर नुसार अल्लू अर्जुन याला ही भूमिका ऑफर करण्यात आली होती मात्र आता त्या भूमिकेत राम चरण दिसणार आहे. अल्लू अर्जुन हा 2 च्या शुटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळं तो या चित्रपटाचा भाग राहणार नाही.

ही भूमिका नक्कीच छोटी असली तरी खूप प्रभावी असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.पण असे झाले तर शाहरुख आणि राम चरण या दोघांच्या चाहत्यांसाठी त्यांना पडद्यावर एकत्र पाहणे ही आनंदाची बातमी असेल.मात्र, बऱ्याच दिवसांपासून राम चरण त्याच्या आगामी चित्रपट RC15 च्या चर्चेत आहे. सध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. यासोबतच बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीही त्याच्यासोबत दिसणार आहे. तर शाहरुख डंकी आणि 'जवान' या दोन्ही चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने