मस्कच्या नव्या घोषणा! इमोजीसह ट्विटची अक्षरमर्यादाही वाढणार; जाणून घ्या डिटेल्स

अमेरिका:  इलॉन मस्कनं आता आणखी काही नव्या घोषणा केल्या आहेत. त्यानुसार ट्विटरची टीम युजर एक्सपिअरन्स अधिक चांगला करण्यासाठी काही नवे फीचर आणण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, इलॉन मस्कनं नुकतचं ट्विटरवरुन जाहीर केलं होतं की, युजर्सना आता लवकरच इमोजीचा देखील वापर करता येणार आहे. त्यामुळं फेसबूकसह, शेअरचॅट, इन्स्टाग्राम आणि इतर सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वापरता येणारे इमोजी आता वापरता येणार आहेत.मस्कनं ट्विटरवर सांगितलं की, आम्ही रिप्लाय करण्याची क्षमता वाढवण्यावर भर देत आहोत. त्यानुसार, एखाद्या व्यक्तीला वैयक्तिक मेसेज करण्यासाठी अर्थात डीएम करण्यासाठी इमोजीचा देखील वापर करता येईल. तसेच त्यानंतर ट्विटरवरील दोन युजर्समधील संवाद इन्क्रिप्शन करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे जेव्हा युजर्सना इमोजी वापरायचे असतील तेव्हा त्यामध्ये फक्त ६ इमोजीचाच पर्याय असेल.ट्विटमधील अक्षर मर्यादा वाढवणार

याशिवाय मस्क ट्विटमधील अक्षरमर्यादा वाढवण्याचं देखील प्लॅनिंग करत आहे. ही अक्षरमर्यादा तब्बल १० हजार अक्षरांची असणार आहे. तसेच कोणाचा काही प्रश्न असेल तर त्याला ट्विटरवर उत्तर देण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने