जंगलातून जाणाऱ्या वाहनांकडून हत्ती करतोय टोल वसूली

मुंबई:  जंगल सफारी करताना अनेकदा आपल्याला जंगली प्राण्यांची क्रूरतेला सामोरं जावं लागतं. काही वेळा जंगली प्राणी मानवांवर हल्ले करत असतात. तर जंगलातून जाणाऱ्या अशा प्राण्यांपासून सावध राहिलं पाहिजे. सध्या एका हत्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये एक हत्ती रस्त्याने जाणाऱ्या वाहनांकडून वेगळ्या प्रकारचा टोल वसूल केला जात आहे.व्हायरल व्हिडिओ एका जंगलातील रस्त्याचा आहे. यामध्ये एक हत्ती उसाच्या गाडीला थांबवताना दिसत आहे. तर गाडीतून उसाची एक मोळी खाली ओढून घेत आहे. त्यानंतर ही गाडी पुढे जाते. हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला असून "हा हत्ती तर टोल वसूली करतोय" अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने