कोल्हापूरच्या तरूणीची हॉलिवूडला गवसणी; VFX च्या पुरुषांच्या जगात यशस्वी कामगिरी!

कोल्हापूर: आजकाल कोणताही चित्रपट ज्याच्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही, असे व्हीएफएक्स तंत्र विकसीत झालं आहे. पूर्वी जसे प्रत्येक क्षेत्रात पुरूषांची मक्तेदारी होती. त्यातील एक प्रमूख क्षेत्र म्हणजे चित्रपट. बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी एकत्र आल्यानंतर एक तीन तासांचा चित्रपट आपल्याला पहायला मिळतो. आज या क्षेत्रातही महिलांची कमतरता नाहीच पण तरीही कुठेतरी कमीपणा जाणवतोच.मग विचार करा या चित्रपटाला द्यावे लागणारे व्हीएफएक्स सारखे अवघड इफेक्ट्स देण्याला एखादी मुलगी आपलं करिअर बनवू शकते? असा विचार तरी तूमच्या मनात येईल का? उत्तर असेल नाही. पण अशी एक तरूणी आहे जी या क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहे. आणि ती तरूणी कोणत्या मोठ्या शहरातून नाही तर कोल्हापूरच्या शाहुवाडी तालूक्यातील आहे. तीच नाव आहे निलम जोंधळे. आज महिला दिनानिमित्त तिची यशोगाथा जाणून घेऊयात.  

निलमचा जन्म कोल्हापूरजवळच्या एका खेडेगावत झाला. घरची परिस्थिती बेताचीच होती. त्यामूळे लहानपणापासूनच निलमला तडजोडीचे आयुष्य जगावे लागले. इतर भावंडांपेक्षा मीच मोठी असल्याने सर्व गोष्टी कमी वाट्याला यायच्या.यात माझं शिक्षणही होतं. मी कशीबशी 12 वी पर्यंत शिक्षण घेऊ शकले. त्यानंतर मला पुढे शिकता आले नाही. शिक्षण थांबल होतं तरी काहीतरी करून दाखवण्याची जिद्द होती. परिस्थिती हालाखिची असेल ना तडजोड करायला अन् जिंकण्याची जिद्द ठेवायला शिकवावं लागत नाही. अगदी तसंच माझ्याबाबतील झालं.शिक्षण थांबलं होतं पण कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी केवळ १२ वीची मार्कलिस्ट घेऊन मी मुंबई गाठली.कोल्हापूर आणि आजूबाजूचा परिसर सोडून मोठ्या शहरात येणं माझ्यासाठी सोप्प नव्हतं.  मी दोन ते तीन ठिकाणी नोकरी केली पण त्यात मन लागले नाही. त्यामूळे पून्हा मी माघारी परतले.





त्याचदरम्यान माझा भाऊ कैलास जोंधळे यांने एक नवे इंस्टीट्युट ओपन करायचे ठरवले होते. हे ऐकलं आणि मला स्वत:मध्ये असलेल्या क्रिएटीव्ह गोष्टींची जाणिव झाली. पण एवढा मोठा कोर्स करण्यासाठी माझ्याकडे पैसे न्हवते. त्यावेळी दादांनी जॉब लागल्यावर पैसे दे असं सांगितलं.मला त्याचं हे प्रपोजल आवडल कारण माझ्याकडे दुसरा काही पर्याय न्हवता. त्यामूळे मी तो कोर्स केला.  ग्रामिण भागात ही संधी उपलब्ध झाल्याने शिकले आणि आज या पदावर पोहोचले.आपण एक गोष्ट चांगली करत असलो की लोक मागे खेचतातच. तसं माझंही झालं. मला अनेक लोकांनी सल्ला दिला की मला या फील्डमध्ये जॉब नको करू. मुलींसाठी हे योग्य नाही. पण सगळे क्षेत्र सारखेच असतात. तसे मी याकडे पाहिले आणि आज एका हॉलिवूडपटांच्या कंपनीत कामही करतेय. हॉलिवूडच्या अनेक चित्रपटात तसेच बॉलिवूडमधीलही अनेक चित्रपट आणि वेबसिरीजसाठी मी व्हीएफएक्स इफेक्ट दिले आहेत. यामध्ये प्रसिद्ध चित्रपट ॲन्ट मॅन, जॉन्ह विक पार्ट 4 चाही समावेश आहे.

आता मला 4 वर्ष झाली या फील्ड मध्ये जॉब करतीये. खूप त्रास झाला पण मी हरले नाही शेवट पर्यंत प्रत्येक अडचणीचा सामना केला. आज मी एका मोठ्या कंपनी मध्ये हॉलिवूड प्रोजेक्ट्स वर काम करते आणि मला चांगलं पॅकेज सुद्धा आहे. आजकाल या फील्डमध्ये काम करायला मुली तयार होत नाहीत. पण, मुलींनी एक नवी संधी म्हणून याकडे पहावे असे माझे मत आहे.आजकाल बरेच तरूण शिक्षण कमी आहे म्हणून मिळेल ते काम करतात. घरकाम, गवंडी, सुतार असं काहीही करतात. ते चुकीचे नाहीत. पण, त्यांनी व्हीएफएक्स सारख्या क्षेत्राकडे पाहिले तर एक चांगले करिअर घडू शकेल. मुलींनीही केवळ घरकाम आणि फॅशन डिझायनिंगमध्ये न अडकता व्हीएफएक्समध्ये उतरावे. ज्यामूळे तूम्ही स्वत: तर सक्षम व्हालच त्याचबरोबर इतर मुली आणि कुटुंबालाही सक्षम कराल. 


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने