आधी बलात्काराचा आरोपी होता, आता बनवला स्वत:चा देश, कोण आहे स्वामी नित्यानंद?

मुंबई: सध्या नित्यानंद स्वामी सध्या चांगलाच चर्चेत आहे कारण स्वामी नित्यानंद याने दक्षिण अमेरिकन देश इक्वेडोर आणि त्रिनिदाद येथे एका बेटाला कैलासा नाव देऊन त्याला स्वत:चा एक नवीन देश घोषित केले आहे.या आधीही स्वामी नित्यानंद चर्चेत आला होता जेव्हा भारतात त्याच्यावर लैंगिक शोषण आणि बलात्काराचा आरोप होता. नित्यानंद आधी बलात्काराचा आरोपी होता तर आता त्याने स्वत:चा देश बनवलाय. कोण आहे हा स्वामी नित्यानंद ? आज आपण त्याच्याविषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत. 

कोण आहे स्वामी नित्यानंद ?

स्वामी नित्यानंद यांचं खर नाव राजशेखरन असून त्याने योग, वेद, तंत्र, शैव याचा अभ्यास केला होता. नित्यानंद याने मेकॅनिकल इंजीनियरिंगमध्ये डिप्लोमा घेतला होता. मात्र या पदव्या खोट्या असल्याचं बोललं जातं. त्याने रामकृष्ण मठमधून आपले शिक्षण पुर्ण केले, असंही म्हणतात.स्वामी नित्यानंदवर आहे बलात्काराचा आरोप

२०१० मध्ये स्वामी नित्यानंद याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये तो एका अभिनेत्रीसह आक्षेपार्ह अवस्थेत होता. मात्र हा व्हिडीओ खोटा असल्याचा दावा त्याने केला होता. याशिवाय २०१२ मध्ये नित्यानंदवर बलात्काराचाही आरोप करण्यात आला होता. त्यानंतर नित्यानंद भारतातून पळून गेला.

नित्यानंदने आता स्वत:चा वेगळा देश बनवला

स्वामी नित्यानंदने दक्षिण अमेरिकन देश इक्वेडोर आणि त्रिनिदाद येथे एका बेटाला कैलासा नाव देऊन त्याला स्वत:चा एक नवीन देश घोषित केले आहे. याशिवाय नित्यानंद यांने संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीला त्याच्या देशातून शिष्टमंडळ पाठवले आहे. यासंबंधी नित्यानंद सोशल मीडियावरुन प्रचार करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने