बिल गेट्स बनले शेफ! स्मृती इराणींसोबत बनवली खिचडी

दिल्ली: भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स जे स्वतः एक कोट्यधिश आहेत ते खिचडीला तडका देताना दिसत आहेत.या व्हिडीओत स्मृती इराणी या गेट्स यांना मदत करताना दिसत आहेत. यानंतर अगदी देसी पध्दतीने गेट्स तडका देतात आणि त्यानंतर त्या खिचडीची चव देखील चाखताना दिसतात.मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासोबत पोषणाद्वारे सक्षमीकरणया मोहिमेत सामील झाले. स्मृती इराणी यांनी शेअर केलेला व्हिडिओ ज्यामध्ये गेट्स खिचडीला तडका देताना दिसत आहेत. स्मृती इराणी म्हणाल्या, "भारतातील सुपर फूड आणि त्यातील पोशन घटक ओळखा.. जेव्हा बिल गेट्स श्री अन्न खिचडीला फोडणी देतात!"इराणी यांच्या या पोस्टला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. या ट्वीटला 6,000 पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. लोक गेट यांच्या प्रयत्नांची प्रशंसा करत आहेत.तर काही वापरकर्त्यांनी स्मृती इराणी यांच्यावर नुकचेट वाढलेल्या सिलेंडरच्या किंमतीवरून टीका देखील केली आहे. तडका मारण्यासाठी चूल पेटवणे तुमच्या सरकारने महाग केलं आहे. तुम्हाला त्यामुळे काही फरक तर पडत नसेल. असेही देश पेटवणाऱ्या लोकांचा चूल पेटवण्याशी काय संबंध असे कमेंट सर्वेश मिश्रा या वापरकर्त्यांने कील आहे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने