"नागालँडमध्ये आमचा पाठिंबा भाजपला नाही तर...." ; शरद पवार यांनी स्पष्ट सांगितल!

मुंबई: नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सात आमदार निवडून आलेले आहेत. या निकालानंतर राष्ट्रवादी हा नागालँडमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. नुकताच नागालँड सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. भाजप आणि एनडीपीपी यांनी सोबत सरकार स्थापन झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रसेने देखील सरकारला पाठिंबा दिला आहे. नागालँडमध्ये भाजप आणि एनडीपीपी सत्तेत आहे. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट केली. आमचा पाठिंबा भाजपला नसून नागालँडच्या मुख्यमंत्र्यांना आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. नागालँडमध्ये भाजपला सर्वात जास्त जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीने पाठिंबा दिला नाहीत तरी त्यांना सरकार बनवायला अडचण येणार नाही. नागालँडमध्ये भाजप एक नंबरचा पक्ष आहे.राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिला म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका होत होती. त्यामुळे शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.शरद पवार म्हणाले, मला आश्चर्य वाटते की मेघालय आणि शेजारच्या राज्यात ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीच्या प्रचाराला देशाचे प्रधानमंत्री आणि देशाचे गृहमंत्री दोघेही गेले होते. प्रधानमंत्र्यांनी मेघालयाच्या प्रचारामध्ये तिथले मुख्यमंत्री आणि राज्यमंत्री भ्रष्टाचारी असल्याचे म्हटले. त्यांचा पराभव करा असं सांगितलं. मात्र निवडूक झाल्यानंतर ते त्यांच्यासोबत सत्तेत सहभागी झाले, अशी भूमिका आम्ही घेतली नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नागालँड सरकारचा भाग व्हावे की नाही याबाबत आज निर्णय घेतला आहे. मंगळवारी सकाळी ईशान्य प्रभारींचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर त्यांनी नागालँड राज्याच्या व्यापक हितासाठी नागालँडचे मुख्यमंत्री एन. रिओ यांचे नेतृत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळाची प्रस्तावित यादीही मंजूर केली, अशी माहिती नरेंद्र वर्मा यांनी दिली होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने