५२ नव्हे १२ गायींचा मृत्यू झाला; कणेरी मठातल्या विषबाधेबद्दल फडणवीसांचं उत्तर

कोल्हापूर: शिळे अन्न खाल्याने कोल्हापुरातल्या कणेरी मठातल्या ५२ गायींचा मृत्यू झाला होता. हाच मुद्दा आता राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान उपस्थित करण्यात आला आहे. या प्रश्नाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत गायींच्या मृत्यूचं कारणही सांगितलं आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आज अधिवेशनादरम्यान कणेरी मठातल्या गाईंच्या संशयास्पद मृत्यूमागचं कारण काय असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "५२ नव्हे तर १२ गायींचा मृत्यू झाला आहे. या १२ गायींच्या शवविच्छेदन अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार, विषबाधेमुळे गायींचा मृत्यू झालेला नाही. पण खाण्यातून ही घटना घडली आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे."कोल्हापुरातल्या कणेरी मठामध्ये तीन आठवड्यांपूर्वी देशी गायींना शिळे अन्न खाऊ घातल्याने ५२ गायींचा मृत्यू झाल्याचं प्रकरण समोर आलं होतं. त्यानंतर या गायींच्या मृत्यूबाबत माहिती देण्यावरुन मठाकडून लपवाछपवी करण्यात येत होती. मृत झालेल्या गायींचा अधिकृत आकडा सांगण्यास पशुवैद्यकीय अधिकारीही तयार नव्हते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने