छाप्याबद्दल विचारताच तेजस्वी यादव करू लागले म्याव-म्याव...

दिल्ली:  राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची ईडी चौकशी सुरू असल्याने त्यांचं कुटुंब सध्या ईडीच्या ताब्यात आहे. त्याच्या घरावर नुकत्याच झालेल्या छाप्याबद्दल माध्यमांनी प्रश्न विचारला असता, त्यांनी अचानक म्याव म्याव करायला सुरुवात केली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.बिहार विधानसभेच्या परिसरामध्ये ईडीच्या छाप्याबद्दल माध्यमांनी त्यांना विचारलं. त्यावर उत्तर देताना त्यांनी माध्यमांनाच टोला लगावला आहे. तेजस्वी यादव म्हणाले, "आता छाप्यामध्ये हे मिळालं, ते मिळालं अशी बातमी चालवतील. सिंहासारखी गर्जना करतील आणि मग १० दिवसांनी म्याव म्याव करु लागतील."तेजस्वी यादव यांच्या या बोलण्यावर आजूबाजूला उभे असलेले आमदार आणि मंत्री हसायला लागले. त्यानंतर त्यांनी भाजपवर निशाणा साधला आणि यावेळीही तपास यंत्रणेला छापेमारीत काहीही सापडले नाही. भाजप खुन्नसमध्येच छापे टाकत आहे पण आता त्यांनीच पराभव स्वीकारला आहे, असं यादव म्हणाले.रेल्वेमध्ये नोकरी घोटाळ्यासाठी जमिनीच्या प्रकरणी ईडीने माजी मुख्यमंत्री आणि लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी यांची पाटणा येथे चौकशी केली होती. त्यानंतर ईडीने पाटणा, दिल्ली आणि रांचीमध्ये जवळपास २४ ठिकाणी छापे टाकले. राबडी देवीची चौकशी आणि त्यांच्या घरावरील छापेमारीवरूनही विरोधक नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने