नाहीतर 'तू झूठी,मै मक्कार' सिनेमात दीपिका पदूकोणच असती..'या' कारणानं बिघडलं सगळं गणित

मुंबई: बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांचा 'तू झूठी..मै मक्कार' सिनेमानं दोन दिवसांत २५ करोडची कमाई केली आहे. एकीकडे जिथं रणबीरचा कॉमेडी अंदाजही लोकांना भावताना दिसतोय तिथे दुसरीकडे श्रद्धाच्या बोल्ड आणि क्यूट अंदाजावार लोक फिदा झालेयत.पण तुम्हाला माहित आहे का की या सिनेमाचे दिग्दर्शक लव रंजन यांची पहिली पसंती श्रद्धा कपूर नाही तर दीपिका पदूकोण होती.या सिनेमात खरंतर रणबीर कपूर आधी अजय देवगण काम करणार होता आणि अभिनेत्रीसाठी दीपिका पदूकोणला पसंती होती. आधी काही कारणानं अजय देवगण सिनेमातून बाहेर पडला तर जुलै २०१९ मध्ये,दीपिका लव रंजनच्या घराबाहेर स्पॉट केली गेली होती.Koimoi च्या रिपोर्टनुसार सिनेमाची अधिकृतरित्या घोषणा होणार होती पण तेवढ्यात सोशल मीडियावर दीपिकाचं नाव ट्रेन्ड होऊ लागलं. आणि चाहते तिला लव रंजन सोबत काम न करण्याचा सल्ला देताना दिसले. सोशल मीडियावर दीपिका यामुळे खूप दिवस ट्रेन्डिंगला होती. ज्यानंतर अखेर दीपिकानं लव रंजनच्या सिनेमातून एक्झिट घेतली.माहितीसाठी सांगतो की काही दिवसांपूर्वी #Metoo खूप ट्रेन्ड होत होतं. काही मॉडेल्सनी इंडस्ट्रीतल्या वेगवेगळ्या लोकांवर गंभीर आरोप केले होते. त्यात एक नाव लव रंजनचं देखील होतं.एका मॉडलने लव रंजनवर आरोप करत म्हटलं होतं की,''कास्टिंगच्या नावावर लव रंजनने तिला पहिलं बिकिनी घालायला सांगितली आणि नंतर ती देखील काढायला सांगत होता''.

लव रंजन 'मी टू' चा आरोपी होता म्हणून दीपिका पदूकोणच्या चाहत्यांना तिनं त्याच्यासोबत काम करू नये असं वाटत होतं. दीपिकानं देखील अखेर आपल्या चाहत्यांचे ऐकले आणि लव रंजनच्या या सिनेमाला नकार कळवला. त्यानंतर लव रंजननं स्क्रीप्टमध्ये बदल करून शेवटी रणबीर-श्रद्धाला कास्ट केलं.दीपिका पदूकोण सद्या 'पठाण' सिनेमामुळे भलतीच चर्चेत आहे. या सिनेमातील तिच्या लूकला आणि अभिनयाला चाहत्यांनी खूप पसंत केलं आहे.दीपिकाच्या वर्कफ्रंट विषयी बोलायचं झालं तर तिच्या खात्यात प्रभाससोबतचा 'प्रोजेक्ट के', हृतिक रोशन सोबतचा 'फायटर',आणि अमिताभ बच्चन सोबतचा 'द इंटर्न' चा समावेश आहे.याव्यतिरिक्त 'सिंघम' च्या नव्या भागातही ती दिसणार आहे. तसंच,दीपिकाकडे सध्या 'महाभारत' आणि एक हॉलीवूड सिनेमा आहे. तसंच,शाहरुखच्या 'जवान' सिनेमातही दीपिकाचा कॅमियो आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने