आयकर विभागात नोकरीची संधी, १० पास ते पदवीधरांना सुवर्णसंधी

मुंबई:  आयकर विभागात विविध पदांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा. जाहिरात निघाल्यापासून १ महिन्याच्या आत हा अर्ज करणं आवश्यक आहे.

एकूण पदे - ४१

पदांची नावं आणि शैक्षणिक पात्रता

१) आयकर निरीक्षक/ Inspector of Income Tax (४ जागा)

मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा समकक्ष

२) कर सहाय्यक / Tax Assistant (१८ जागा )

मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा समकक्ष (२ जागा), डेटा एंट्री गती प्रती तास ८००० की.

३) मल्टी टास्कींग स्टाफ / Multi Tasking Staff (MTS) (१९ जागा)

मान्यता प्राप्त बोर्ड / विद्यापीठातून १० वी पास असणे आवश्यक



वयोमर्यादा - यात SC/ST – ५ वर्षे सूट, OBC – ३ वर्षे सूट

  • इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर - १८ - ३० वर्ष

  • टॅक्स असिस्टंट - १८-२७ वर्ष

  • मल्टी टास्कींग स्टाफ - १८-२५ वर्ष

अंदाजे पगार

इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर - ४४,९०० ते १,४२,४०० रुपये

टॅक्स असिस्टंट - २५५०० ते ८१,१०० रुपये

मल्टी टास्कींग स्टाफ - १८००० ते ५६,९०० रुपये

अर्ज ऑफलाइन करणं गरजेचं आहे. त्यासाठी

पत्ता - अतिरिक्त आयकर आयुक्त कार्यालय (प्रशासन), दुसरा मजला, आयाकर भवन, १६/६९, सिव्हिल लाइन्स, कानपूर -२०८ ००१  अधिकृत संकेतस्थळ (वेबसाइट) - www.incometaxindia.gov.in

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने