कोरोनाचा जन्म चीनच्या प्रयोगशाळेतलाच;अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांचा धक्कादायक दावा

वुहान: जगभर थैमान घातलेल्या कोरोना विषाणूच्या उगमस्थानाबद्दल आता धक्कादायक खुलासे होत आहेत. या विषाणूचा उगम चीनमधल्या वुहान इथल्या लॅबमध्येच झाल्याचा खळबळजनक दावा अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने केला आहे.चीनमधल्या वुहान इथल्या प्रयोगशाळेत कोरोना विषाणूचा जन्म झाला, असा आरोप गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत होता. पण त्याबद्दल कोणतेही ठोस पुरावे हाती आले नव्हते. मात्र आता अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा एफबीआयने हा दावा केला आहे. संचालक ख्रिस्तोफर व्रे यांनी हा दावा केला असून कोरोनाचा जन्म वुहानमधल्या प्रयोगशाळेतच झाल्याचं त्यांनी कन्फर्म केलं आहे.व्रे म्हणाले की, आम्ही अमेरिकेतल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे. गेल्या काही वर्षांपासून कोरोनाच्या उगमस्थानाबद्दल संशोधन करत आहोत. या दरम्यान आम्ही जी निरीक्षणं नोंदवली, त्यानुसार कोरोनाचा जन्म हा चीनच्या वुहानमधल्या प्रयोगशाळेतून झाल्याचं दिसतं.या बद्दल जे कोणी काम करत आहे, किंवा संशोधन करतात, त्यांच्या कामामध्ये चीनमधल्या सरकारकडून अडथळे आणले जात आहे..

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने