आगामी निवडणुकीसाठी सैनिकांनी सज्ज राहावे; किशोरी पेडणेकर

माजलगाव : भाजपने केलेल्या षड्यंत्रामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना पक्ष व पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह हिरावण्याचे कारस्थान झाले. असे असले तरी सच्चा सैनिक मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्याच खंबीरपणे पाठीशी असून आगामी निवडणुकीसाठी शिवसैनिकांनी सज्ज राहावे असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले.येथील राजस्थानी मंगल कार्यालयात शिवगर्जना मेळाव्याचे आयोजन (ता. २८) मंगळवारी करण्यात आले होते. या मेळाव्यास आलेल्या मान्यवरांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. या मेळाव्यास जिल्हा संपर्क प्रमुख धोंडू पाटील, युवासेना प्रमुख अंकित प्रभू, माजी आमदार अनिल कदम, माजी आमदार सुनील धांडे, बाळासाहेब अंबुरे,जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव, जिल्हाप्रमुख अनिल जगताप, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख अॅड. संगिता चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. श्रीमती पेडणेकर म्हणाल्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली गद्दारी संपूर्ण महाराष्ट्राने ओळखली आहे. सच्चा शिवसैनिक व राज्यातील जनता ही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आजही खंबीरपणे उभी आहे.२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी ६३ आमदार निवडून आणले होते. आगामी निवडणुकीतही यापेक्षाही जास्त आमदार निवडून येतील. यावेळी माजी आमदार अनिल कदम, धोंडू पाटील, जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव, जिल्हाप्रमुख अनिल जगताप, संपदा गडकरी, संगिता चव्हाण यांचीही भाषणे झाली.कार्यक्रमास महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख राजेश्री जाधव, युवासेना जिल्हाप्रमुख शुभम डाके, तालुकाप्रमुख प्रभाकर धरपडे, दत्ता रांजवण, मदन परदेशी, संदीप माने, कालिदास नवले, गोरख सिंघम, पप्पु ठक्कर, रामराजे सोळंके, रामदास ढगे, व्यंकटेश शिंदे, रत्नाकर शिंदे, गणेश वडेकर, संदीप माने आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन कल्याण बल्लाळे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने