"देशातल्या अनेक राज्यांमध्ये भाजपा नाही; आगामी बदलांसाठी ही गोष्ट अनुकूल"

मुंबई: देशात नुकत्याच दोन राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपाने दणदणीत विजय मिळवला. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी देशातल्या भाजपाच्या सत्तेच्या स्थितीवर भाष्य केलं आहे. देशात बदलाचा सूर तयार होत असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बारामतीमध्ये माध्यमांशी बोलत होते. पवार म्हणाले, "देशात बदलाचा सूर तयार होतोय. केरळमध्ये भाजपा नाही, तामिळनाडूमध्ये भाजपा नाही - कर्नाटकमध्ये तिथे काँग्रेस होतं, आमदार खासदार फोडले, आता भाजपा आहे. देशातल्या अनेक राज्यांमध्ये भाजपा नाही."


शरद पवार पुढे म्हणाले, "सगळं चित्र दिसयंत ते देशात बदलाचं वारं असल्याचं आहे. त्याचे परिणाम पुढच्या निवडणुकीत बघायला मिळतील. पोटनिवडणूक विधान परिषदेत भाजपाला अपेक्षित यश नाही. देशातल्या अनेक राज्यांमध्ये भाजपा नाही. ही गोष्ट आगामी बदलांसाठी अनुकुल आहे. "देशात नागालँड आणि त्रिपुरामध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये भाजपाने विजय मिळवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने