अदानी समूहाला म्युच्युअल फंडचा दणका; 'या' कंपन्यांमधील हिस्सेदारी केली कमी

मुंबई: गेल्या जानेवारीत हिंडेनबर्गच्या अहवालानंतर गौतम अदानी समूहाचे शेअर्स मोठ्या प्रमाणावर कोसळले. या काळात केवळ गुंतवणूकदारांनी अदानी समूह सोडला नाही तर म्युच्युअल फंडांनीही त्यांचे स्टेक कमी केले आहेत.ब्रोकरेज आणि रिसर्च फर्म ICICIDirect च्या आकडेवारीनुसार, म्युच्युअल फंडांनी अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड, अदानी टोटल गॅस आणि अंबुजा सिमेंट्समधील होल्डिंग कमी केले आहे.फेब्रुवारी 2023 मध्ये ही हिस्सेदारी कमी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे वेदांत, टाटा पॉवर, बँक ऑफ बडोदा, यूपीएल आदी म्युच्युअल फंडांची विक्रीही दिसून आली. अदानी समूहाच्या आठ सूचीबद्ध कंपन्यांचे शेअर्स बुधवारी वाढीसह बंद झाले. अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड (AEL) चे शेअर्स बीएसईवर 5.81 टक्क्यांनी वाढून 1,838.80 रुपयांवर बंद झाले. कंपनीने बीएसईवर रु. 1,891.10 या इंट्राडे उच्चांकापर्यंत मजल मारली.त्याच वेळी त्याचे बाजार भांडवल वाढून 2.09 लाख कोटी रुपये झाले. अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनचे शेअर्स 3.81 टक्क्यांनी वाढून 679.10 रुपयांवर बंद झाले.याशिवाय अदानी ट्रान्समिशन 3.27 टक्क्यांनी वाढून 931 रुपये आणि अंबुजा सिमेंट 3.28 टक्क्यांनी वाढून 364.95 रुपयांवर बंद झाले.

त्याच वेळी, अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर 4.94 टक्क्यांनी वाढून 740.95 रुपयांवर बंद झाला. अदानी विल्मार 3.12 टक्क्यांनी वाढून 426.70 रुपयांवर आणि एनडीटीव्ही 0.85 टक्क्यांनी वाढून 212.85 रुपयांवर बंद झाले. ACC देखील 0.11 टक्क्यांनी वाढून 1,740.40 रुपये झाला.दुसरीकडे अदानी टोटल गॅसचे शेअर्स 3.05 टक्क्यांनी घरून 918.85 रुपयांवर बंद झाले. याशिवाय अदानी पॉवरही 1.27 टक्क्यांनी घसरून 202.15 रुपयांवर बंद झाला. या कंपन्यांच्या शेअर्सनीही बीएसईवर घसरण दर्शवली आहे.एकीकडे गौतम अदानी यांचा अदानी समूह बँकांमधील कर्ज कमी करण्याच्या तयारीत आहे. गौतम अदानी यांना आता कर्जाचा बोजा कमी करायचा आहे. अदानी समूह आता यासाठी निधी उभारण्याच्या तयारीत आहे.अदानी समूह निधी उभारण्यासाठी अंबुजा सिमेंटमधील हिस्सा विकण्याच्या प्रक्रियेत आहे. याच दरम्यान आता म्युच्युअल फंडांनी अदानी समूहामधील हिस्सेदारी कमी केली आहे. त्याचा मोठा फटका आता अदानी समूहाला बसणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने