'अजितदादांच्या पंचसूत्रीवर फडणवीसांच बजेट'

मुंबई: राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला. देशाच्या अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प असून, राज्याचा अर्थसंकल्प पंचामृत ध्येयांवर आधारित असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. दरम्यान, विरोधकांकडून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी ट्विट करत अजितदादांच्या पंचसूत्रीवर फडणवीसांच बजेट असल्याचे म्हटलं आहे. 'अजित पवार यांनी मविआ सरकारच्या काळात गेल्या अर्थसंकल्पात पंचसूत्रीचा वापर करत अर्थसंकल्पाची फ्रेम कशी असावी याचा उत्तम दाखला दिला होता.त्याच संकल्पनेचा संदर्भ घेत केंद्रीय अर्थमंत्र्यांनी गेल्या महिन्यात सप्तर्षी संकल्पना वापरली आणि गेल्या वर्षी अजितदादांच्या पंचसूत्रीवर टीका करणाऱ्या फडणवीस साहेबांनी आज त्याच संकल्पनेचा आधार घेतला.' अशा आशयाचे ट्विट रोहित पवारांनी केलं आहे. रोहित पवारच नव्हे तर विरोधक पक्षनेते अजित पवार यांनी, आमच्या अर्थसंकल्पातील बऱ्याचशा बाबी फडणवीसांच्या अर्थसंकल्पात असल्याचा दावा केल आहे.

फडणवीसांचा अर्थसंकल्प पंचामृतांवर आधारलेला...

  1. शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी

  2. महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसीसह सर्व घटकांना सर्वसमावेशक विकास

  3. भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत विकास

  4. रोजगार हमीतून विकास

  5. पर्यावरणपूरक विकास

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने