टाटांकडून करार रद्द झाल्यानंतर बिस्लेरीला मिळाला नवा CEO

मुंबई: बिस्लेरी इंटरनॅशनलचे चेअरमन रमेश चौहान यांची मुलगी जयंती चौहान आता बिस्लेरी कंपनीची प्रमुख असणार आहे. टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड (TCPL) सोबत अधिग्रहणाची चर्चा संपल्यानंतर कंपनीने जयंतीकडे नेतृत्व सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.बिस्लेरीचे चेअरमन रमेश चौहान यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की जयंती आमच्या व्यावसायिक टीमसोबत कंपनी चालवेल आणि आता आम्हाला आमचा व्यवसाय विकायचा नाही.जयंती चौहान सध्या बिस्लेरी इंटरनॅशनल या तिच्या वडिलांनी प्रमोट केलेल्या आणि तयार केलेल्या कंपनीच्या उपाध्यक्षा आहेत. जयंती चौहान या मुख्य कार्यकारी अँजेलो जॉर्ज यांच्या नेतृत्वाखालील व्यावसायिक व्यवस्थापन संघासोबत काम करेल.जयंती चौहान यांचे बालपण दिल्ली, मुंबई आणि न्यूयॉर्क सारख्या शहरात गेले आहे. हायस्कूलनंतर, त्यांनी लॉस एंजेलिसमधील FIDM (फॅशन इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन आणि मर्चेंडाइझिंग) येथे उत्पादन विकासाचा अभ्यास केला.जयंती यांनी लंडन कॉलेज ऑफ फॅशनमधून फॅशन स्टाइलिंग आणि फोटोग्राफीचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी अनेक आघाडीच्या फॅशन हाउसमध्ये इंटर्न म्हणूनही काम केले आहे. लंडन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज (SOAS) मधून त्यांनी अरबी भाषा शिकली आहे.वयाच्या 24 व्या वर्षी जयंती चौहान यांनी वडिलांसोबत बिस्लेरीच्या दिल्ली कार्यालयात काम करण्यास सुरुवात केली. त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये, जयंती यांनी बिस्लेरीच्या प्लांटचे नूतनीकरण आणि प्रक्रिया ऑटोमेशनवर लक्ष केंद्रित केले.

त्यांनी कंपनीच्या मानव संसाधन विभागात (HR) तसेच विक्री आणि मार्केटिंग टीममध्ये महत्त्वपूर्ण बदल केले. 2011 मध्ये जयंती दिल्लीहून मुंबईत शिफ्ट झाल्या.बिस्लेरीची स्थापना इटालियन ब्रँड म्हणून झाली. कंपनीने 1965 मध्ये भारतात व्यवसाय सुरू केला. चौहान यांनी 1969 मध्ये विकत घेतला. कंपनीचे 122 ऑपरेशनल प्लांट आहेत.भारत आणि शेजारील देशांमध्ये 4,500 वितरक आणि सुमारे 5,000 ट्रक आहेत. चौहान यांनी 1993 मध्ये त्यांचे सॉफ्ट ड्रिंक ब्रँड थम्स अप, गोल्ड स्पॉट आणि लिम्का कोका-कोलाला विकले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने