मुख्यमंत्र्यांच्या लेकीच्या ईडी चौकशी पूर्वी तेलंगणात झळकले 'Bye Bye Modi' चे poster

तेलंगणा: तेलंगणतील भारत राष्ट्र समितीचे नेते आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची मुलगी के कविता यांची दिल्ली दारू धोरण प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (आज) शनिवारी चौकशी करणार आहे. याच प्रकरणात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना तपास यंत्रणेने अटक केली आहे.दरम्यान, या चौकशीपूर्वीच तेलंगणातील हैदराबाद येथे जोरदार पोस्टरबाजी दिसून येत आहे. हैदराबाद येथील विविध ठिकाणी 'Bye Bye Modi' चे पोस्टर दिसून आले आहेत. या पोस्टरवरती इतर पक्षांतून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या नेत्यांचे फोटो लावण्यात आले आहेत.लावण्यात आलेल्या या पोस्टरवर महाराष्टातील नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश राज्यातील नेत्यांचेही फोटो आहेत. ज्यामध्ये हे नेते भाजपमध्ये गेल्यावर कसे बदलले आहेत हे त्यांच्या अंगातील भगव्या शर्टच्या माध्यमातून दाखवण्यात आलं आहे.बीआरएसच्या नेत्या आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री सी चंद्रशेखर राव यांच्या कन्या के कवीता यांना गुरुवारी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर रहायचे होते. मात्र,संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. त्यात महिला आरक्षण विधेयक सादर करायचे असल्यामुळे त्यांनी चौकशीसाठी शुक्रवारी हजर राहणार असल्याचं म्हटलं होतं. ज्याला ईडीने संमती दर्शवली होती. दरम्यान, आज त्यांची चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.ईडीने शुक्रवारी न्यायालयाला माहिती देताना सांगितले की, उत्पादन शुल्क धोरण तयार करण्यामागे एक षडयंत्र आहे. हे षडयंत्र विजय नायर यांच्यासह इतरांनी रचले होते. घाऊक विक्रेत्यांना असाधारण आणि नफ्यासाठी उत्पादन शुल्क धोरण आणले होते असे ईडीने न्यायालयाला सांगितले आहे. याबाबतचे वृत्त एएनआयने आपल्या वृत्तात दिले आहे. विजय नायर आणि बीआरएस नेते के कविता यांच्या भेटीबाबत ई़डीने न्यायालयाला माहिती दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने