महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत मोठी भरती; पन्नाशीच्या वरच्यांना संधी

मुंबई: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित येथे काही जागांसाठी भरती करण्यात येत आहे. जागांबाबतची अधिसूचना कंपनीकडून जारी करण्यात आली असून इच्छुकांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.याविषयीचे अर्ज मागवण्याची प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे. याविषयीची अधिक माहिती जाणून घ्या.

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेडमध्ये

पदे - अधिकारी, सहाय्यक अधिकारी, महाव्यवस्थापक, सेवानिवृत्त अभियंता

पदांनुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख - १७, ३१ मार्च आणि १० एप्रिल २०२३

एकूण जागा - ५५

नोकरीचं ठिकाण - महाराष्ट्र

शैक्षणिक पात्रता -

अधिकारी - मान्यता प्राप्त विद्यापीठाची बॅचलर पदवी किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी पदवी.

सहाय्यक अधिकारी - मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभीयांत्रिकी पदवी

महाव्यवस्थापक - CA/ICWA उत्तीर्ण

सेवानिवृत्त अभियंता - मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभीयांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील पदवी.

वयोमर्यादा - ५३ ते ६२ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.

जाहिरात पाहण्यासाठी https://www.mahagenco.in/eerteels/2023/03/Advt-04_2023-08.03.2023.pdf या लिंकला भेट द्या.



अर्ज पाठवण्याचा पत्ता - असिस्टंट जनरल मॅनेजर (एचआर-आरसी), महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लि., एस्ट्रेला बॅटरीज एक्सपेन्शन कंपाउंड, तळमजला, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई – ४०० ०१९

याशिवायकंपनीकडून कनिष्ठ अधिकारी (सुरक्षा) या पदावरसुद्धा भरती केली जात आहे. ती ३४ जागांसाठी असेल.

शैक्षणिक पात्रता - कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.

वयोमर्यादा - १८ ते ३८ वयोगट

वेतन - ३७, ३४० ते १,०३, ३७५ रुपयांपर्यंत.

अधिकच्या माहितीसाठी कंपनीची अधिकृत बेवसाईट https://www.mahagenco.in/ ला अवश्य भेट द्या.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने