कर्रम, कुर्रम...कुर्रम कर्रम! घरा-घरात पोहोचलेल्या लिज्जत पापडाचा डोलारा सातजणींनी उभा केला

मुंबई: ९० च्या दशकात एखादं बाळ घरात रडत असेल आणि त्याचवेळी ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट टीव्हीवर येणारा ससा पाहून शांत व्हायचं. तो ससा यायचा आणि एका पापडाचे कौतूक करत कर्रम, कुर्रम...कुर्रम कर्रम लिज्जत पापड असं म्हणून निघून जायचा. तो पापड आणि ससा आजही वयाच्या ३० शीत असलेल्या सर्वांनाच आठवत असेल. त्याच पापडाच्या कंपनीची स्थापना आजच्या दिवशी झाली होती.उडीद पापड घराघरात पोहोचवणाऱ्या लिज्जत पापडाची संकल्पना नक्की कोणाच्या डोक्यात आली. त्यामागील उद्देश काय होता, हे त्यानिमित्ताने जाणून घेऊयात.

भारतात क्वचितच कोणी असेल, ज्याला स्वादिष्ट लिज्जत पापड बद्दल माहिती नसेल. लिज्जत पापड जितका लोकप्रिय आहे तितकी त्याची यशोगाथा चांगली आहे. सात मैत्रिणींनी सुरू केलेला लिज्जत पापड आज एक यशस्वी आणि प्रेरणादायी कथा बनला आहे.लिज्जत पापडचा प्रवास जसवंती बेन आणि त्यांच्या मुंबईत राहणाऱ्या सहा मैत्रिणींनी १९५९ मध्ये केला होता. हे सुरू करण्यामागे या सात महिलांचे उद्दिष्ट उद्योग सुरू करणे किंवा अधिक पैसे कमवणे हे नव्हते. तर यातून त्या महिलांना कुटुंबाच्या खर्चात हातभार लावायचा होता.या महिला फारशा शिकलेल्या नसल्यामुळे त्यांना घराबाहेर काम करतानाही अनेक अडचणींचा सामना करावा लागला त्यामुळे या गुजराती महिलांनी पापड बनवून विकण्याचा बेत आखला, जे त्या घरी बनवू शकतात.



जसवंती जमनादास पोपट यांनी ठरवलं आणि त्यांच्यासोबत पार्वतीबेन रामदास थोडानी, उजमबेन नारनदास कुंडलिया, बानुबेन तन्ना, लागूबेन अमृतलाल गोकाणी, जयाबेन विठलानी यांनी पापड बनवायला सुरुवात करायची.पापड बनवण्याची योजना बनवली होती, पण ते सुरू करण्यासाठी पैशांची गरज होती. पैशांसाठी या सात महिलांनी सर्व्हंट ऑफ इंडिया सोसायटीचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते छगनलाल पारेख यांच्याकडे पोहोचले. त्यांनी त्यांना 80 रुपये दिले. त्या पैशातून महिलांनी पापड बनवण्यासाठी मशीन आणि साहित्यही खरेदी केले.

या महिलांनी सुरुवातीला पापडांची चार पाकिटे बनवून एका मोठ्या व्यापाऱ्याला विकली. यानंतर व्यापाऱ्याने त्याच्याकडे आणखी पापडाची मागणी केली. या महिलांच्या कष्टाचे चीज झाले आणि त्यांची विक्री दिवसेंदिवस चौपटीने वाढत गेली.१९६२ मध्ये या संस्थेचे नाव 'श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड' असे ठेवण्यात आले. चार वर्षांनंतर म्हणजेच १९६६ मध्ये लिज्जतची सोसायटी नोंदणी कायदा १८६० अंतर्गत नोंदणी करण्यात आली.केवळ चार पाकिटे विकून प्रवास सुरू केलेल्या लिज्जत पापडची उलाढाल 2002 साली 10 कोटींवर पोहोचली आहे. सध्या या समूहाच्या भारतात 60 हून अधिक शाखा आहेत, ज्यामध्ये 45 हजारांहून अधिक महिला काम करत आहेत.

लिज्जत पापडाला मिळालेले पुरस्कार

लिज्जत पापडला 2002 मध्ये इकॉनॉमिक टाइम्स बिझनेस वुमन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर,  2005 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना ब्रँड इक्विटी पुरस्कारही मिळाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने