पंकजा मुंडेंच्या विरोधात निवडणूक लढवणार का? सुषमा अंधारे म्हणाल्या...

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे आपल्या भाषणामुळे सतत चर्चेत असतात. त्यांच्या भाषणानंतर शिंदे गट आणि सुषमा अंधारे यांच्यामध्ये चांगलेच चांगलेच वाद दिसून येतात. तर, आता सुषमा अंधारे यांनी आपला मोर्चा भाजपकडे वळवला आहे.शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांवर सुषमा अंधारे यांनी टीका केली तर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना लक्ष केला आहे. 'परळीत भाजप संपर्क कार्यालय आहे मात्र त्या कार्यालयात कोणीच दिसत नाही' असा खोचक टोला सुषमा अंधारे यांनी पंकजा मुंडे यांना लगावला आहे. बीडमध्ये परळीत उद्धव ठाकरे गटाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सुषमा अंधारे यांच्या हस्ते पार पडलं. या कार्यक्रमावेळी त्या बोलत होत्या.'परळी सारख्या ठिकाणी शिवसेनेचे संपर्क कार्यालय होत आहे. इथं राष्ट्रवादीचं देखील कार्यालय आहे, भाजपचं देखील संपर्क कार्यालय आहे. मात्र त्या भाजपच्या कार्यालयात कोणीच नसतं, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना खोचक टोला लगावला आहे.परळीतुन निवडणुक लढवण्यावर त्या पुढे म्हणाल्या की मी परळीतच नाही तर बीड जिल्ह्यात कुठेही निवडणूक लढवणार नाही, विशेष म्हणजे "इलाका तुम्हारा और धमाका हमारा होंगा". अशी शायरी म्हणत त्यांनी टोलेबाजी केली. दरम्यान या शायरी मधला टोला नेमका कोणाला लगावला? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगु लागली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने