'हा' चित्रपट ठरला ऑस्करचा 'बाहुबली'! एक-दोन नव्हे तर पटकावले तब्बल सात पुरस्कार

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून अवघ्या जगाला उत्सूकता लागून राहिलेल्या प्रतिष्ठेचा ऑस्कर सोहळा आज संपन्न झाला. ऑस्कर 2023 मध्ये भारताने आपला ठसा उमटवला आहे. 95 व्या अकादमी पुरस्कारांच्या प्रत्येक श्रेणीतील विजेत्याचे नावं समोर आली आहे.त्याचवेळी, कोणत्या चित्रपटाने यंदाच्या ऑस्करमध्ये सर्वाधिक पुरस्कार पटकावले हेही कळालं आहे. तर जाणुन घेवुया कोणत्या चित्रपटाने यंदाच्या ऑस्करमध्ये सर्वाधिक पुरस्कार आपल्या नावे पटकावले आहे. या चित्रपटाचं नाव आहे ‘Everything Everywhere All at Once’.सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार या चित्रपटाला मिळाला आहे.'Everything Everywhere All at Once' याने 'सर्वोत्कृष्ट चित्रात नामांकन मिळाले' 'ऑल क्वायट ऑन द वेस्टर्न फ्रंट', 'अवतार: द वे ऑफ वॉटर', 'एल्विस' 'द फेबलमॅन्स' ,'टार', 'टॉप गन: मेवरिक' या अनेक चित्रपटांना हरवून हा पुरस्कार त्यांनी आपल्या नावे केला आहे. त्याचबरोबर या चित्रपटाला सात पुरस्कार मिळाले आहेत.

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: जेमी ली कर्टिस

'एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स'च्या जेमी ली कर्टिसने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा ऑस्कर २०२३ जिंकला आहे. यासह तिने अँजेला बॅसेट (ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरेव्हर), हाँग चाऊ (द व्हेल), केरी कॉन्डोन (द बॅन्शीज ऑफ इनिशरीन) यांना हरवलं आहे.

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: के हुई क्वान

के हुई क्वानने एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्ससाठी 95 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये प्रथम सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार जिंकला.सर्वोत्कृष्ट लेखन (ओरिजनल स्क्रीनप्ले)

डॅनियल क्वान आणि डॅनियल शिनर्ट यांना मूळ पटकथेसाठी सर्वोत्कृष्ट लेखनाचा पुरस्कार मिळाला. हे 'एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स' या चित्रपटाशीही संबंधित आहे.

सर्वोत्कृष्ट मुख्य अभिनेत्री: मीशा येओह

सर्वोत्कृष्ट लीड एक्ट्रेसचा किताब मिशेल योहच्या नावे झाला. 'एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स'साठीच त्यांना हा सन्मान मिळाला आहे.

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन: डॅनियल क्वान आणि डॅनियल शिनर्ट

डॅनियल क्वान आणि डॅनियल शिनर्ट यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. याच चित्रपटासाठीच त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. डॅनियल क्वान आणि डॅनियल शिनर्ट यांनी स्टीव्हन स्पीलबर्गचा पराभव केला आहे.

सर्वोत्कृष्ट पिक्चर

सर्वोत्कृष्ट पिक्चरसाठी ऑस्कर पुरस्कार 2023 देखील 'एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स'ला मिळाला आहे. यासह डॅनियल क्वान, डॅनियल शीन आणि जोनाथन वांग चित्रपटाचे निर्माते यांनी मोठा विजय मिळवला आहे.

सर्वोत्कृष्ट चित्रपट संपादन (एडिटिंग)

सर्वोत्कृष्ट चित्रपट संपादनासाठीचा ऑस्करही 'एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स'ला मिळाला आहे. यासाठी पॉल रॉजर्स यांना सन्मानित करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने