पुतिन यांना मोठा झटका! आंतरराष्ट्रीय कोर्टानं जारी केलं अटक वॉरंट

रशिया: रशिया आणि युक्रेनमधील युद्ध एका वर्षाहून अधिक काळ सुरू आहे. यादरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिमिनल कोर्टाने रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांना मोठा झटका दिला . या युद्धादरम्यान इंटरनॅशनल क्रिमीनल कोर्टाने युक्रेनमधील युद्ध गुन्ह्यांसाठी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.हे वॉरंट जारी करताा न्यायालयाने म्हटले आहे की, युक्रेनने व्यापलेल्या प्रदेशातून रशियन फेडरेशनमध्ये नागरिकांच्या (विशेषत: लहान मुलांचे) बेकायदेशीर ट्रांसफर करण्याच्या युद्ध गुन्ह्यासाठी रशियन अध्यक्ष कथितपणे जबाबदार आहेत.



न्यायालयाने काय म्हटले?

24 फेब्रुवारी 2022 रोजी रशियाच्या आक्रमणाच्या सुरुवातीपासूनच युक्रेनच्या ताब्यात असलेल्या प्रदेशात हे गुन्हे कथितपणे घडल्याचे न्यायालयाने नमूद केले. तसेच कोर्टाने असे नमूद केले अशा बाबींवर विश्वास ठेवण्यासाठी पुरेसा पुरावा आहे की, पुतीन यांनी थेट किंवा दुसऱ्यांच्या मदतीने असे कृत्य करण्यासाठी व्यक्तिगत अपराधिक जबाबदारी पार पाडली आहे.

न्यायालयाने म्हटले आहे की मारिया अलेक्सेयेवना लव्होवा-बेलोवा, रशियन राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयातील बाल हक्क आयुक्त, मुलांच्या बेकायदेशीर निर्वासन आणि नागरिकांच्या बेकायदेशीर ट्रान्सफरच्या युद्ध गुन्ह्यासाठी कथितपणे जबाबदार आहेत. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीपासून युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू आहे. यादरम्यान युक्रेनने वारंवार रशियावर युद्ध गुन्ह्यांचा आरोप केला आहे.दरम्यान युक्रेनने केलेल्या अशा अत्याचाराचे आरोप रशियाने वारंवार फेटाळून लावले आहेत. इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टाच्या प्री-ट्रायल चेंबर-2 ने पुतीनसह दोन जणांविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. यापैकी दुसरे नाव हे मारिया अलेक्सेयेवना लव्होवा-बेलोवा यांचे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने