स्वतःचे दुःख लपवून जगाला हसवणाऱ्या चार्ली चॅपलीनचा मृतदेहही गेला होता चोरीला

स्वीत्झर्लंड: जगभरात सर्वात मोठा कॉमेडियन म्हणून आजही चार्ली चॅपलीन ओळखला जातो. स्वतःच्या आयुष्यात अनेक दुःख, कष्ट भोगलेला चार्ली चॅपलीन मात्र कायम इतरांना हसवतच राहीला. स्वतःचे दुःख लपवून इतरांना त्यांचे दुःख विसरायला लावणारा हा किमयागार होता.१६ मार्च १८८९ मध्ये जन्म तर २५ डिसेंबर १९७७ मध्ये त्याचा मृत्यू झाला होता. ८८ वर्ष तो जगला पण त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पार्थिवाचीही चोरी झाली होती. काय आहे किस्सा जाणून घेऊया.मृतदेहाची चोरी

चार्लीला स्वीत्झर्लंडच्या कोर्सियर सर वेवे मध्ये दफन करण्यात आलं होतं. पुरल्या नंतर तीन महिन्यांनी त्याचा मृतदेह चोरीला गेला. मृतदेह चोरल्यानंतर चोरांनी चार्लीच्या पत्नी उना चॅपलीन यांना खंडणीची मागणी केली. या गोष्टीची माहिती कळताच पोलिसांनी ताबडतोब कृती केली आणि चोरही पकडले गेले. दोन जणांनी त्याचा मृतदेह चोरला होती. त्यांच नाव रोमना वारदा, आणि गेंचो गानेव असं होतं.

नव्या व्यवसायासाठी चोरी

चौकशीच्या दरम्यान या चोरांनी सांगितलं की, आर्थिक ताणातून जात होते. त्यामुळे चार्लीच्या मृतदेहाच्या खंडणीतून मिळणाऱ्या पैशांनी त्यांना नवा व्यवसाय सुरू करायचा होता. यानंतर चार्लीचा मृतदेहाला स्वित्झर्लंडच्या जवळ असलेल्या विलेज ऑ नोविले इथे पुरण्यात आलं. यानंतर चार्लीची कब्र काँक्रिटने बनवण्यात आली, जेणे करून परत चोरी होऊ नये.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने