अजित पवार आवडीचे, त्यामुळे मीडिया ट्रायल : एकनाथ खडसे

मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार मीडियाच्या आवडीचे आहेत. त्यामुळे ते दिसले नाहीत, की अस्वस्थता वाढते.त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाची ‘मीडिया ट्रायल’ करण्यात आली, असे मत माजी मंत्री तथा आमदार एकनाथ खडसे  यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले.राज्याचे विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार ४० आमदारांसह भारतीय जनता पक्षात जाणार याबाबत जोरदार चर्चा सुरू होती. याबाबत राष्ट्रवादी कॉंगेसचे नेते, आमदार एकनाथ खडसे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, की यात कोणतेही तथ्य नाही.अजित पवार यांनीच पत्रकार परिषद घेऊन ‘जोपर्यंत माझ्यात जीवात जीव आहे, तोपर्यंत राष्ट्रवादीचे काम करत राहणार’, असे जाहीर केले आहे. त्यामुळे हा विषय संपला आहे.अजित पवार यांच्यावर मीडियाचे प्रेम आहे. ते त्यांच्या आवडीचे आहेत. त्यामुळे ते दिसले नाहीत, की ‘नॉट रिचेबल’ असल्याचे सांगितले जाते, तसेच कधी नाथाभाऊवरही प्रेम असते.दिसलो नाही, की ‘नॉट रिचेबल’ आहेत, असे सांगितले जाते. अजित पवार यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशाची ही ‘मीडिया ट्रायल’ होती. आता हा प्रश्‍न सुटला आहे. अजित पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच राहणार आहेत, ते कोठेही जाणार नाहीत, हे त्यांनीच स्पष्ट केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने