ज्युनियर एनटीआरसोबत काम करण्यास सैफ आहे उत्साहित... 'एनटीआर 30' बद्दल केला खुलासा

मुंबई: ज्युनियर एनटीआर त्याच्या 'एनटीआर ३०' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान देखील या चित्रपटाचा एक भाग आहे आणि त्याने त्याचे शूटिंग देखील सुरू केले आहे. अलीकडेच चित्रपटाच्या सेटवरून ज्युनियर एनटीआरचे सैफ अली खानसोबतचे फोटो व्हायरल झाले होते. सैफ अली खान या तेलगू चित्रपटात काम करण्यासाठी खूप उत्सुक आहे.कोरताला शिवा दिग्दर्शित या चित्रपटाचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही. सैफने अलीकडेच एका मीडिया मुलाखतीत या चित्रपटाबद्दल आणि तेलुगू चित्रपटसृष्टीतील त्याच्या प्रवेशाबद्दल सांगितले. तो म्हणाला, 'मी खूप उत्साहित आहे! हे नवीन क्षेत्र आहे. सेट व्यवस्थित आहे. लोकांची वागणूक देखील खूप चांगली आहे. खूप छान वेळ जातोय.'चित्रपटातील आपल्या भूमिकेबाबत सैफ अली खान म्हणाला, 'माझी भूमिका खूपच छान आहे. मी माझ्या व्यक्तिरेखेसाठी खूप मेहनत घेत आहे.' सैफ अली खाननेही कोरताला शिवाचे कौतुक केले आणि म्हणाला, 'माझा दिग्दर्शक खूप उत्साही व्यक्ती आहे. त्याने मला या चित्रपटाची स्क्रिप्ट तीन तास सांगितली, जी मला खूप आवडली. या चित्रपटाशी मी भावनिकरित्या जोडलो गेलो आहे.'यादरम्यान ज्युनियर एनटीआरबद्दल बोलताना सैफ म्हणाला, 'तो खूप मिलनसार आहे. ज्युनियर एनटीआर स्वतः या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहे आणि त्याची योजना वेगळी आहे.' सैफ अली खान आणि ज्युनियर एनटीआर व्यतिरिक्त जान्हवी कपूर देखील या चित्रपटाचा एक भाग असणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने