'अरे बापरे चक्क चंद्रकांत दादांनी महात्मा फुले जयंती दिनी शुभेच्छा दिल्या'; राष्ट्रवादीचा खोचक टोला

मुंबई: आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती. सत्यशोधक, स्त्री शिक्षणाचे जनक, एक मोठे समाजसेवक होते. मात्र जयंती वरून राष्ट्रवादी-भाजपच्या नेत्यांमध्ये ट्विटर वॉर चालू झालं आहे. भाजपचे नेते आणि मंत्री चद्रकांत पाटील यांनी ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.कॅप्शन दिलं आहे की, "थोर समाजसुधारक,भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक, क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांची आज जयंती! महाराष्ट्राला कृतीशील असा वैचारीक वारसा देणाऱ्या आणि कुप्रथेच्या गर्तेतील भारतीय समाजासाठी समतेची पहाट आणणाऱ्या क्रांतिसूर्य महात्मा फुले यांना जयंतीदिनी त्रिवार वंदन!"या ट्विटचा धागा पकडत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी चद्रकांत पाटलांवर निशाना साधला आहे. मिटकरी यांनी ट्विट करत म्हटंल आहे की, "अरे बापरे चक्क चंद्रकांत दादांनी महात्मा फुले जयंती दिनी शुभेच्छा दिल्यात, वाह क्या बात है? "देर आये दुरुस्त आये!" तुमच्या व्हीडिओ मध्ये "सर्व साक्ष जगद्गपती lत्यासी नकोची मध्यस्थी" हा फुलेंचा अखंड आलाय, याचा अर्थ समजुन घेतला तरी आपण जयंतीच्या मनापासून शुभेच्छा दिल्यात असे समजू!

चंद्रकांत पाटील यांचं फुले-आंबेडकर, कर्मवीर यांच्या विषयी वादग्रस्त विधान

चंद्रकांत पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडं भीक मागितली, असं विधान त्यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर याबद्दल तीव्र प्रतिक्रिया समोर आल्या होत्या चंद्रकांत पाटील यांनी पैठण येथील एका कार्यक्रमात बोलत हे विधान केलं होतं. दरम्यान पाटील यांच्या या विधानामुळे त्यांच्यावर शाई फेकण्यात आली होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने