"१५ दिवसांत दिल्ली आणि महाराष्ट्रात दोन राजकीय स्फोट होतील" ; सुप्रिया सुळेंचा मोठा दावा

मुंबई: महाराष्ट्रात राजकीय चर्चांना मोठ उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपमध्ये जाण्याचा चर्चा होत आहेत. दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठा दावा केला आहे. येत्या पंधरा दिवसांत दोन राजकीय स्फोट होणार असल्याचा दावा सुप्रिया सुळे यांनी केला आहे.सुप्रिया सुळे म्हणाल्या, एक स्फोट दिल्लीत होईल आणि दुसरा स्फोट महाराष्ट्रात होईल. विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा असताना सुप्रिया सुळे यांनी हे वक्तव्य केले आहे. याबाबत आज तकने वृत्त दिले आहे.सुप्रिया सुळे यांच्या विधानानंतर राजकीय अटकळांचा पर्व सुरू झाला आहे. अजित पवार कुठे आहेत, असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला. यावर सुळे म्हणाल्या, माध्यमांनी अजित पवारांच्या मागे युनिट लावले आहे. राज्यात अनेक समस्या आहेत, राज्यात चुकीच्या पद्धतीने काम सुरू आहे."अजित पवार भाजपमध्ये प्रवेश करणार का?, यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, "हे दादांना विचारा, मला गॉसिपसाठी वेळ नाही. लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडे खूप काम आहेत. त्यामुळे मला त्याची माहिती नाही. पण कष्ट करणारा नेता म्हणून सर्वांनाच अजित पवार आवडतात, म्हणूनच अशी विधाने केली जातात."छत्रपती संभाजी नगर येथील महाविकास आघाडीच्या सभेत जयंत पाटील यांचे भाषण झाले नाही. याचा अर्थ असा नाही की ते रागावले आहेत. महाविकास आघाडीच्या प्रत्येक सभेत दोनच लोक बोलायचे हे आधीच ठरले होते. तसेच अजित पवार नाराज असल्याच्या या सर्व अफवा आहेत. ज्या झाडांना जास्त फळे येतात, त्या झाडांवरच दगडफेक केली जाते, असे देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने