रवी राणा-भाजप वाद पेटला! जय श्रीरामच्या घोषणा देत भाजप पदाधिकाऱ्यांनी नामफलकांना काळं फासल

अमरावती: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे दांपत्य भाजपच्या जवळचे मानलं जातं. अनेक आंदोलनात आणि कार्यक्रमात रवी राणा भाजपच्या साथीत असतात. नवनीत राणा अपक्ष खासदार आहेत. त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. मात्र याच दांपत्याला अमरावतीत भाजपकडून कडाडून विरोध होत आहे.अमरावतीतील विकास कामावरून भाजप आणि रवी राणा यांच्यात श्रेयवाद निर्माण झाला आहे. रवी राणा यांनी अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे प्रस्तावित केली. मात्र अजुनही एकाही रस्त्याच काम प्रत्यक्षात सुरू झालं नाही. त्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं.भाजप नगरसेवकांनी केलेल्या कामाच्या ठिकाणी रवी राणा यांचे फलक लावण्यात आले होते. या फलकांवर काळं फासत भाजप पदाधिकाऱ्यांनी रवी राणा यांचा निषेध नोंदवला. भाजप पदाधिकारी यावेळी जय श्रीरामच्या घोषणा देत होते. एकंदरीतच राज्यात आणि देशपातळीवर भाजपला पाठिंबा देणाऱ्या राणा दांपत्याला अमरावतीत मात्र भाजपच्या विरोधाला सामोरं जावं लागत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने