सर्वोच्च न्यायालयात केकची सोय कोण करतं; सरन्यायाधीशांनी घेतली फिरकी!

मुंबई: सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जस्टिस डी वाय चंद्रचूड हे आपल्या विधानांमुळे सतत चर्चेत असतात. ते कायम हसतमुख असतात, थट्टामस्करी करत असतात, असंही त्यांचे सहकारी सांगतात. अशीच मस्करी त्यांनी आज सर्वोच्च न्यायालयात केली आहे.१३ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयात ८ नव्या न्यायाधीशांच्या स्वागताच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात बोलताना चंद्रचूड म्हणाले की, आजच दिवस आपल्या सर्वांच्या आयुष्यातला खूप छान दिवस आहे. दिवसाची सुरुवात चॉकलेट आणि ऑरेंज केकने झाली. या केकची सोय जस्टिस संजय कौल यांनी केली होती.कोणाचा वाढदिवस असेल तर सकाळी सकाळी मस्त केकची सोय तेच करतात. आणि आता दिवसाच्या शेवटी हा स्वागत समारंभ होतोय, कारण मी आता संध्याकाळी पुन्हा चेंबरमध्ये बसणार नाहीये, असं चंद्रचूड म्हणताच हशा पिकला.सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष विकास सिंह यांचीही चंद्रचूड यांनी मस्करी केली. क्रिकेट मॅचची आठवण करून देताना चंद्रचूड म्हणाले की, मी सगळे वकील आणि न्यायाधीशांमध्ये क्रिकेटची मॅच करण्याचा विकासचा आग्रह आत्तापर्यंत टाळत होतो. पण आता आठ नवीन न्यायाधीश आल्याने आपल्याकडे दिग्गज क्रिकेटर्स आले आहेत.

कोण आहेत संजय किशन कौल?

जस्टिस संजय किशन कौल हे मूळचे जम्मू काश्मीरच्या श्रीनगरचे आहेत. ते सध्या सर्वोच्च न्यायालयाचे सर्वात सीनियर न्यायाधीश आहेत. ते १९८२ पासून वकिली करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने