राष्ट्रवादीत धुसफूस कायम; उद्या होणाऱ्या शिबीर पत्रकात अजित पवारांच नाव नाहीच

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात अजित पवार चांगलेच चर्चेत आले आहेत. अजित पवार बंडखोरी करत भाजपसोबत सत्ता स्थापन करणार अशा वावड्या उठत होत्या. त्यांनी पत्रकार परिषद घेत चर्चेला पुर्णविराम दिला. दरम्यान मोठी अपडेट समोर आली आहे. राष्ट्रवादीच्या उद्या होणाऱ्या शिबीर पत्रकात अजित पवारांच नावं नसल्याने. पुन्हा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सदर शिबीराच्या पत्रकामध्ये दिलेल्या माहितीनुसार, सदर शिबीराचे उद्घाटन माननीय प्रदेशाध्यक्ष श्री जयंत पाटील साहेब यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात येईल.तसेच, खासदार प्रफुल्ल पटेल साहेब, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार सुनिल तटकरे, माजी मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री आदिती तटकरे, माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत व राजकीय वक्ते यांच्या अभ्यासपूर्ण विश्लेषणाने हे शिबीर पुढे कार्यरत होणार आहे. मात्र, यासर्वात अजित पवारांचे नाव वगळल्याने पुन्हा राज्यात खळबळ माजली आहे.प्रसिद्धी पत्रकात काय म्हटले आहे?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली तसेच माननीय प्रदेशाध्यक्ष श्री जयंत पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली, शुक्रवार, दिनांक २९ एप्रिल २०१३ रोजी सकाळी 9.00 वा ते सायंकाळी ६.०० वा. या वेळेत मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने 'ध्येय राष्ट्रवादीचे... मुंबई विकासाचे...' या शिर्षकाखाली 'कार्यकर्ता मार्गदर्शन शिवीर २०२३ वे आयोजन करण्यात येणार आहे.सदर शिबीराचे उद्घाटन माननीय प्रदेशाध्यक्ष श्री जयंत पाटील साहेब यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात येईल. त्याचबरोबर खासदार प्रफुल्ल पटेल साहेब, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार सुनिल तटकरे, माजी मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री आदिती तटकरे, माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत व राजकीय वक्ते यांच्या अभ्यासपूर्ण विश्लेषणाने हे शिबीर पुढे कार्यरत होईल.

या शिबीरासाठी मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे २००० हून अधिक प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पक्षसंघटनात्मक पुनर्रचना तसेच आगामी मुंबई महानगपालिकेच्या निवडणुकांसाठी करावयाची तयारी व मार्गदर्शन, हे या कार्यक्रमाचे प्रमुख मुद्दे असतील.सध्या महाराष्ट्रातील अस्थिर राजकीय परिस्थिती, महिलांची असुरक्षितता, महागाई, बेरोजगारी, परराज्यात जाणारे उद्योग, महापुरुषांचा अवमान, वोट बँक मिळवण्याच्या नादात लोकांच्या जीवाची पर्वा न करणे, सुशोभिकरण प्रकल्पाच्या अंतर्गत मुंबईचे खरे रूप दडवणे, नागरी सुविधा प्रश्नांवर पूर्णपणे दुर्लक्ष करणे अशा व इतर विविध मुद्द्यांवर या कार्यकर्ता मार्गदर्शन शिवीरामध्ये चर्चा व मार्गदर्शन केले जाईल.तरी आपल्या माध्यमातून सदर कार्यकर्ता मार्गदर्शन शिवीरास प्रसिद्धी मिळणेसंदर्भात सहकार्य करावे व आपल्या संस्थेचा एक प्रतिनिधी कॅमेरामन सहीत या कार्यक्रमास पाठवावा, ही नम्र विनंती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने