महाराष्ट्राची क्रश असणाऱ्या प्राजक्ताला आधी सलमानसोबत करायचं होत लग्न अन् आता....

मुंबई:  मराठीमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही फार कमी कालावधीत प्रसिद्धिच्या शिखरावर पोहचली आहे. प्राजक्ता केवळ लोकप्रिय अभिनेत्री नाही तर उत्तम डान्सर देखील आहे. सध्या ती महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो होस्ट करत असते. प्राजक्ता नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. प्राजक्ताचं फॅन फॉलोइंग लईच तगड आहे.प्राजक्ता हे सध्या मराठी मनोरंजन विश्वातलं चर्चेतलं नाव बनले आहे. प्राजक्ताने आपल्या चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकली. ती एकाच शैलीचे चित्रपट करण्यापेक्षा वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपटातुन प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. तिने 'पावनखिंड', 'पांडू', 'वाय' , 'लाकडाऊन' ती सतत प्रकाशझोतात असते.
नुकतच तिने प्राजक्तराज हा तिचा ज्वेलरी ब्रॅण्डही सुरु केला आहे. त्याचे व्हिडिओही ती सेशल मिडियावर शेअर करत असते. प्राजक्ता ही महाराष्ट्राची क्रश आहे असं देखील बोललं जातं. ती सोशल मिडियावर देखील खुप सक्रिय असते. ती कित्येक मुलांची क्रश आहे हे खरं पण तिचा क्रश कोण? तर यावर प्राजक्ताने यापुर्वीही बऱ्याच वेळा खुलासा केलाय मात्र आता पुन्हा या विषयाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.यापुर्वी प्राजक्ताने सांगितलं होत की ती वैभव तत्ववादीवर फिदा झाली होती. तो तिचा क्रश झाला होता. वैभव तत्ववादीच्या 'कॉफी आणि बरंच' हा चित्रपट पाहिल्यानंतर ती त्याच्या प्रेमात पडली होती.मात्र आता पुन्हा तिने एका मुलाखतीत सांगतिलं की तिला बॉलिवूड स्टार सलमान खानसोबत लग्न करायचं आहे. तिच्या या वक्तव्याची सध्या सोशल मिडियावर चर्चा रंगली आहे. सलमान खान हा तिला खूप आवडतो असं ती यावेळी म्हणाली. सलमान खान हा तिचा पहिला बॉलिवूडमधला सेलिब्रिटी होता.

सलमान खान हा तिचा लहानपणीचा क्रश होता असं ती म्हणाली. याविषयी बोलतांना तिनं सांगतिलं की, तिला सलमान खान खुप आवडायचा. त्यावेळी ती अगदीच लहान होती. ती दोन-तीन वर्षांची असेन. खरं तर तिच्या आतेभावाचा तो आवडता हिरो होता. त्यामुळे त्याने तिला शिकवलं होतं. आणि त्यामुळे ती म्हणायची की तिला सलमान खानशी लग्न करायचं. तिचे जुने दिवस आठवल्यानंतर प्राजक्ताला हसू आलं.आता तिच्या या वक्तव्याची चर्चा सोशल मिडियावर रंगली असून तिचे चाहते यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. यापुर्वी ती म्हणाली आहे की, ती लग्न करणार..पण मुलगा अमराठी असेल किंवा मराठी हे माहित नाही पण जरी तो अमराठी असला तरी त्याला मराठमोळं बनवेन.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने