ते पाप मी करणार नाही, मी साधा सरळ माणूस; ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर चंद्रकांत पाटलांच स्पष्टीकरण

मुंबई: मी मुंबईकर आहे. बाळासाहेबांचे मराठी माणसावर ऋण असलेलं मी जाणतो. बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल मी मुंबईकर असल्याने आदरच आहे.अस विधान भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर केले. तसेच मी साधा सरळ माणूस आहे. गरिबीतून आलो आहे. असही ते यावेळी म्हणाले. ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर चंद्रकांत पाटील यांनीही पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी त्याच्या वक्तव्याचा नेमका मुद्दा काय याचे स्पष्टीकरण दिले आहे.काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

पत्रकारांशी संवाद साधताना पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. संजय राऊत वारंवार बोलत असतात पण बाबरी पाडताना कुठे होते? असा पुन्हा सवाल उपस्थित करत हाच मुद्दा माझा होता. असं स्पष्ट केलं आहे.बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल मी मुंबईकर असल्याने आदरच आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबत अश्रद्ध नाही. त्यांचा अनादर होईल असं माझा तोंडून निघणार ही नाही.त्या मुलाखतीत मी आदर व्यक्त केला आहेच. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता. पत्रकार परिषद घेत सांगा की, बाळासाहेबांद्दल अनादर नाही.माझा त्यातला जो सवाल आहे जो लागला आहे तो म्हणजे संजय राऊत कुठे होते? 

संजय राऊत वारंवार बोलत असतात. बाळासाहेबांबद्दल बोलताना मी नेहमी श्रद्धा व्यक्त केली आहे. बाळासाहेबांमुळं हिंदू जिवंत राहिलं.उद्धव ठाकरे आणि माझे संबध चांगले आहेत. बाळासाहेबांच्या अनादराचं पाप आम्ही करणार नाही. त्यांच्याबद्दल मी अशब्द बोलेण का? सगळे हिंदू होते. शिवसैनिक असा भेद नव्हता. कुठल्या एका पक्षानं बाबरी पाडलेली नाही.पाडण्याचा संघर्ष विश्व हिंदू परिषतेच्या नेतृत्वाखाली झाला. भाजप सुद्धा त्यांच्या नेतृत्वाखाली होते. सातत्याने ८३ पासून संघर्ष झाला.पण बाळासाहेबांबद्दल माझ्या मनात आदर आहे. ते पाप मी करणार नाही, मी साधा सरळ माणूस आहे. असही पाटील यावेळी म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने